ढवळ्या-पवळ्यासह बळीराजाचे दुपट्टा टोपीने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:01+5:302021-09-08T04:42:01+5:30
कोरोना संकटाने प्रत्येक सण प्रभावी झालेला आहे; परंतु आलेल्या संकटाला हसतमुखाने सामोरे जात संकटाशी दोन हात करण्याची परंपरा भारतीयांनी ...
कोरोना संकटाने प्रत्येक सण प्रभावी झालेला आहे; परंतु आलेल्या संकटाला हसतमुखाने सामोरे जात संकटाशी दोन हात करण्याची परंपरा भारतीयांनी जपली आहे. बळीराजाचे व त्याच्या सर्जा-राजाची मनोभावे पूजा करून ईडापीडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो, अशी मनोकामना माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत यांनी सपत्नीक केली. घरी आलेल्या सर्व बैलजोड्यांना नैवेद्याच घास भरवीत सर्जाचे आशीर्वाद घेतले. बळीराजासह उपस्थितांनी एक नमन गवरा गौराचा जयघोष करीत पोळा उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या उत्सवाला प्रेरणादायी समजत शेतकऱ्यांची व त्याच्या ढवळ्या-पवळ्याची विशेष पूजाअर्चा करीत सन्मानित करण्याचे सांगितले आहे. यंदाचा हंगाम कमी पावसात व्यवस्थित दिसत असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर पोळ्याचा आनंद ओसंडून वाहत होता.