आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान

By Admin | Published: March 25, 2017 12:35 AM2017-03-25T00:35:26+5:302017-03-25T00:35:26+5:30

शिक्षण क्षेत्रातील अनेक दस्ताऐवजावर प्राधान्याने आईला सन्मान मिळू लागला आहे. या सन्मानातून आईचे महत्व आभाळासम असल्याचे दिसून येते.

Honor in the bank bank account now with the children | आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान

आता मुलांसह मिळणार आईला बँक खात्यात सन्मान

googlenewsNext

गणवेश लाभ बँक खात्यात : सत्रारंभी गणवेश वितरण
मोहाडी : शिक्षण क्षेत्रातील अनेक दस्ताऐवजावर प्राधान्याने आईला सन्मान मिळू लागला आहे. या सन्मानातून आईचे महत्व आभाळासम असल्याचे दिसून येते. आता आणखी या सन्मानात भर पडली आहे. पुढील सत्रापासुन गणवेश लाभाचे हस्तांतरण थेट बँक खात्यात होणार आहे. यासाठी बँक खाती आई व मुल यांच्या नावे संयुक्तपणे उघडली जावी अशा सुचना शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आईला सन्मान देणे सुरु केले आहे. शाळेच्या जनरल रजिस्टरवर आईचा नाव नोंदविणे आवश्यक करण्यात आले आहे. दहावी, बारावीचा निकाल बघायचा असेल तर आईचा नाव घातल्याशिवाय संगणकावर निकाल येत नाही. शालांत परिक्षेची गुणपत्रिका, प्रमाणपत्रावर आईचे नाव मुद्रित केल्या जाते. आता शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे जावून विविध योजनेत विद्यार्थ्यांसह आईचे नाव जोडत आहे. यावर्षी पासून २०१७-१८ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश योजनेच्या गणवेश लाभाचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक बचत खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधान्याने स्वत: पाल्य व त्यांच्या आईचे नावे संयुक्त बँक खाती उघडण्यात याव्यात असे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. आई हयात नसल्यास त्या विद्यार्थ्यांचे पालक, अभिभावक यांचे नावे संयुक्त बँक खाती उघडता येणार आहे. जनरल रजिस्टर, गुणपत्रिका यानंतर आता आईला मुलासोबत बँक खाते उघडण्यासाठी मान दिला गेला आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधून शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील सर्व प्रवर्गातील मुले यांना योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियान २०१७-१८ च्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

५७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
भंडारा जिल्ह्यातील ५७ हजार ४२५ विद्यार्थ्यांसाठी प्रति गणवेश २०० रुपये, या दराने दोन गणवेश संचाकरिता ४०० रुपये प्रति विद्यार्थी रोख रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. २८८ लाख ८४४ हजार रुपये प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. यात भंडारा तालुक्यातील ४७९२ मुली, ३२४४ मुले, लाखांदूर मुली ४३८०, मुले २९५९, लाखनी मुली ३४५५, मुले २६१९, मोहाडी मुली ५६१०, मुले ४२२१, पवनी मुली ४५३९ मुले २६९५, साकोली मुली ३९९१ मुले ३३५८ व तुमसर तालुक्यासाठी ६३२८ मुली व ५२३४ मुले असे एकूण ५७४२५ लाभार्थी आहेत. मोफत गणवेश वितरणाची कार्यवाही शाळा सुरु होण्यापूर्वी करायची आहे.
विद्यार्थ्यांचे आईसह राहणार संयुक्त खाते
या योजनेच्या लाभासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे आईसह संयुक्त खाती नॅशनल बँक, ग्रामीण बँक अथवा पोस्टआॅफीसमध्ये बँक खाते उघडता येतील. सदर योजनेचा लाभार्थी विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अनिवार्य आहे. गणवेशाचा रंग प्रकार याचा निर्णय शाळा व्यवस्थापन यांना राहिल. गणवेश योजनेचा निधी थेट संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होईल. गणवेश पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी स्वत: आपल्या पाल्यास दोन गणवेश संच खरेदी करुन, खरेदी केलेल्या पावत्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी वर्ग करायचा आहे. पुढील सत्रारंभ झाल्यापासून एका महिन्याच्या आत रोख स्वरुपात स्वत: पाल्य व त्याच्या आईच्या नावे बचत बँक खात्यात वर्ग करण्याची कार्यवाही गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना करावयाची आहे.

वडिलापेक्षा आईवर जास्त भरवसा केला जातो. आईला प्रत्येक ठिकाणी महत्व प्राप्त झाले आहे. पूर्वी आई पडद्याआड राहायची. ती आता पुढे येत आहे. मातासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे.
- तेजस्विनी देशमुख, केंद्रप्रमुख, मोहगाव देवी केंद्र मोहाडी.

भविष्याचा वेध घेणारी आईच असते. आर्थिक नियोजन आईलाच छान जमते. शासनाने आईवर विश्वास ठेवला. या विश्वासाचा सन्मान माताना दिला गेला.
- सुषमा ठवकर, पालक माता,
जि.प शाळा कान्हळगाव/ सिरसोली.

Web Title: Honor in the bank bank account now with the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.