साहित्यिक हरिश्चंद्र बोरकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:25 PM2019-08-19T22:25:28+5:302019-08-19T22:26:58+5:30
झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : झाडीबोली साहित्य चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यीक लखनसिंह कटरे, अशोक गुप्ता, राजन जयस्वाल, हिरामण लांजे, अॅड. ए.पी. परशुरामकर, यादवराव कापगते, आयोजक प्रकाश बाळबुद्धे, माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, डी.जी. रंगारी, झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेश देशमुख, अजिंक्य भांडारकर उपस्थित होते.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी केवळ राजकारणीच नव्हे तर साहित्यिक आणि कवी होते. याच गोष्टीचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात प्रकाश बाळबुद्धे यांनी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या कार्याचा आढावा घेत अटलजींच्या कवितांचे सादरीकरण केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. बोरकर यांनी झाडीबोलीतील लोकसाहित्य कशापद्धतीने पुढे नेले याची माहिती दिली.
नवदितांना लिहिते व्हा असा सल्ला दिला. यश मिळवायचे असेल तर परिश्रमाला श्रद्धेची जोड द्या, असे सांगितले.
यावेळी डॉ. बोरकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन मिलिंद रंगारी यांनी तर आभार यादोराव कापगते यांनी मानले.