हा सन्मान म्हणजे बळ देणारा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:07+5:302021-02-06T05:06:07+5:30
शास्त्री विद्यालयात कोरोना योद्धांचा सन्मान भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, लॅाकडाऊनचा काळ, सर्वत्र भयाचे सावट. पण अशा परिस्थितीत झगडून,मन कणखर ...
शास्त्री विद्यालयात कोरोना योद्धांचा सन्मान
भंडारा : कोरोनाचा प्रादुर्भाव, लॅाकडाऊनचा काळ, सर्वत्र भयाचे सावट. पण अशा परिस्थितीत झगडून,मन कणखर केले. कोरोनाशी चार हात करुन कोरोना मुक्त होऊन पुनश्च शाळा व्यवहारात हिरिरीने सहभागी होऊन कनिष्ठ महाविद्यालयाची धुरा प्रभावीपणे सांभाळणारे लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख एस.जी.यावलकर यांचा शाळा व्यवस्थापन समितीकडून प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामुजी शहारे यांनी केलेल्या सत्कारास उत्तर देताना ‘माझी शाळा माझे कुटुंब आहे. संकटाच्या काळात माझे हे कुटुंब सोबत होते,या सर्वांच्या सदिच्छांचे पाठबळ होते म्हणून मी पुनश्च नवे जीवन पाहू शकलो’ असे भावूक उद्गार एस.जी.यावलकर यांनी काढले.
कुटुंबातली व्यक्ती अस्वस्थ असेल तर सारे कुटुंबच विचलित होते. खंबीरपणे त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहून मानसिकरित्या सुदृढ करण्यावर भर द्यावा लागतो तेच आमच्या शाळेतल्या प्रत्येक घटकाने केले,मला माझ्या शाळेतल्या या घटकाचा अभिमान आहे असे समाधानकारक प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामुजी शहारे यांनी केले.
या सत्कार सोहळ्यास शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या किरण नागभिरे,ममता गणवीर,कामटे, झलके पातोडे, लक्ष्मी राऊत तिवाडेताई,प्राचार्या केशर बोकडे, हे उपस्थित होते.
संचालन क्रीडा शिक्षक सुनील खिलोटे यांनी केले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.