जिजाऊ मानून स्त्रीचा सन्मान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:27 PM2018-04-07T22:27:25+5:302018-04-07T22:27:25+5:30
भारतात स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली जाते. परंतु जिवंत स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे पुरूषी म्हणून घेणाऱ्यांकरिता लांच्छनास्पद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतात स्त्रीला देवीचे रूप मानून तिच्या दगडाच्या मूर्तीची पूजा केली जाते. परंतु जिवंत स्त्रीवर बलात्कार केला जातो, हे पुरूषी म्हणून घेणाऱ्यांकरिता लांच्छनास्पद आहे. प्रत्येक स्त्री ही आई आहे म्हणून प्रत्येक पुरूषाने आपल्या घरातील स्त्रीसह सर्व स्त्रियांना जिजाऊ मानून तिचा सन्मान करणे आवश्यक आहे. तेव्हाच आमचा पुरूषी अहंकार नष्ट होऊ शकतो, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले.
विदर्भात मराठा सेवा संघाचा जनसंवाद कार्यक्रम सुरू आहे. त्याअनुषंगाने पुरूषोत्तम खेडेकर हे भंडारा जिल्ह्यात आले असता त्यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टीचे संचालक अरविंद गावंडे, जिल्हा कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, दिलीप चौधरी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल भुसारी उपस्थित होते.
यावेळी तरकसे म्हणाले, मनरेगा ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी कशी फायद्याची आहे, असे सांगून शासनाद्वारे राबविण्यात येणाºया योजनांची माहिती दिली. जिजाऊ सृष्टीचे संचालक अरविंद गावंडे यांनी सिंदखेडराजा येथे निर्माण करण्यात येणाºया जिजाऊ सृष्टीची माहिती देऊन मातृतिर्थाचे महत्त्व सांगून जिजाऊ सृष्टीकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले. दिलीप चौधरी म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळातीळ शाळा व आजच्या काळातील शाळा एकच आहेत, या आधुनिक शाळांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारानेच संपवून सर्वसामान्य लोकांच्या मनातील स्वराज्य निर्माण करता येऊ शकते.
याप्रसंगी प्रस्ताविकातून अनिल भुसारी यांनी मराठा सेवा संघाची भूमिका विषद केली. कार्यक्रमाची सुरूवात केदार नाकाडे यांनी जिजाऊ वंदना गाऊन केली. संचालन तालुकाध्यक्ष चंद्रकांत लांजेवार यांनी तर आभारप्रदर्शन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी यशवंत भोयर, भगवान बाभरे, दत्ता हातेकर, रूपेश पानतावणे, पंकज घाटे, विक्रम कांबळी, सुदाम बोरकर, जयशंकर मने, गणेश नंदांवर, राजु चामट, अनिल झंझाड, श्याम कोसरे, प्रतिमा लांडगे, अंजली लांजेवार, सीमा उताणे, कल्पना चामट, विजय बालपांडे, आशिष ठाकरे, विश्वास बडवाईक, मंगेश राऊत, दिनेश बालपांडे, मंगेश राऊत यांच्यासह मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.