जिल्ह्यात हुडहुडी..पारा ६ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:00 AM2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:25+5:30

डिसेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल नव्हती. या आठवड्यात थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Hoodhoodi in the district at 6 degrees Celsius | जिल्ह्यात हुडहुडी..पारा ६ अंशावर

जिल्ह्यात हुडहुडी..पारा ६ अंशावर

Next
ठळक मुद्देशेकोटीच्या संख्येत वाढ : दैनंदिन कामावरही जाणवतोय परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. पारा ६ अंशापर्यंत घसरला असून सर्वत्र हुडहुडी वाढली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बोचऱ्या थंडीला आता सुरुवात झाली आहे. या बोचऱ्या थंडीमूळे लाखांदूर तालुक्यातील सोनी गाव परिसरात शनिवारला चार जणांचा मृत्यू झाला आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला ढगाळ हवामान आणि मध्येच रिमझिम पाऊस अशी स्थिती होती. त्यामुळे काही ठिकाणी अति उकाडा तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नोव्हेंबर महिन्याअखेरीस थंडीची चाहूल नव्हती. या आठवड्यात थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
सध्या जिल्ह्यात वातावरणामध्ये गारठा निर्माण झाला आहे. उकाडा आणि पावसाने हैराण झालेले नागरिक थंडीची वाट पाहात होते. यावर्षी थंडी येणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. आता थंडीची चाहूल लागल्यामुळे काहीसा दिलासा आहे. रविवारचे किमान तापमान ६ अंश तर कमाल तापमान २२ अंश नोंदविण्यात आले आहे. रात्री शीतलहरीमुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवायला लागले आहे.
अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी पेटवून थंडीचा आनंद लुटतानाही पाहायला मिळत आहे. थंडीची लाट आणखी काही दिवस राहणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे असे आवाहनही आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

गुलाबी थंडीत नववर्षाचे स्वागत
नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सगळी तरुणाई व ज्येष्ठही नवीन वर्षाच्या स्वागत कशा प्रकारे करायचे या तयारीला लागले असून, नवे बेत आखत आहेत. तर नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची सजावट करण्यात येत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रा तसेच नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या वर्षाला अखेराचा निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी युवक-युवती विविध कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी करीत असतात. पूर्वी अनेकांच्या घरावरील छतावर नववर्षाच्या स्वागताच्या पार्टी दिसून येत होत्या. मात्र आता हे प्रकार बंद असल्याचे दिसून येत आहेत. अनेक युवक आऊटिंग, सिनेमा, हॉटेलिंग, धाबा, दुरवर फिरायला जाणे अशाप्रकारचे सेलिब्रेशन करीत असल्याचे आढळून येतात. नवीन वषार्चे स्वागत डान्स आणि मस्तीने करण्यासाठी म्युझिक बॅन्ड, डीजे, आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अनेक हॉटेल्समध्ये करण्यात येणार आहे. डान्स फ्लोअरची खास व्यवस्था केली आहे.

Web Title: Hoodhoodi in the district at 6 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान