आशा कार्यकर्ता, परिचारिकांचे कार्य मोलाचे

By admin | Published: August 24, 2016 12:18 AM2016-08-24T00:18:08+5:302016-08-24T00:18:08+5:30

आशा कार्यकर्ता व परिचारिका या खऱ्या अर्थाने रुग्णाची मोठी सेवा करतात.

Hope workers, nurse staff work | आशा कार्यकर्ता, परिचारिकांचे कार्य मोलाचे

आशा कार्यकर्ता, परिचारिकांचे कार्य मोलाचे

Next

डेंग्यू प्रतिरोध मोहीम जनजागृती : रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
कोंढा (कोसरा) : आशा कार्यकर्ता व परिचारिका या खऱ्या अर्थाने रुग्णाची मोठी सेवा करतात. अडीअडचणीत व खडतर मार्ग असले तरी त्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत रुग्णांना आणण्याचे कार्य करतात म्हणून त्या सर्वाच्या सिस्टर आहेत. असे उद्गार प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथे डेंग्यू प्रतिरोध मोहिमेच्या जनजागृती कार्यक्रमात आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत डेंग्यू प्रतिरोध महिना जनजागृती कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विविध निबंध, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या रेखा भुसारी अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पवनी तालुका भाजपाध्यक्ष के. डी. मोटघरे, प्राचार्य जी. के. वैद्य, प्राचार्य इ. एम. गहाणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. झलके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम, प्रा. सी. एम. बावने, बळीराम रघुते, डॉ. प्रभाकर लेपसे, सरपंच मालची माया तलमले उपस्थित होत्या.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांनी जून ते आॅक्टोंबर महिन्यात आरोग्य विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांगर्तत घेण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती दिली. डॉ. प्रभाकर लेपसे यांनी डेंग्यू प्रतिरोध महिण्यात २६ गावात स्वच्छता अभियान, १६ गावात चित्रकला स्पर्धा, कोंढा आठवडी बाजारात प्रदर्शन, १६ गावात सर्वेक्षण, ७४२ लोकांचे रक्तांचे नमुणे तपासण्यात आले. असल्याचे सांगून या कार्यात वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले. डेंग्यू प्रतिरोध मोहिमेवर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर तालुक्यात निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक तनूजा बबन जांभूळकर व काजल गजानन जासूद यांनी मिळविले.
द्वितीय क्रमांक दिपक डहाके व लोकेश पंढरे यांनी मिळविले. तृतीय क्रमांक श्रध्दा मुर्कने, राखी सोनटक्के, प्रतीक सोनटक्के, काजल हुकरे, गायत्री शिवणकर, रिना नागपुरे यांचे आले. सर्वांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांच्या हस्ते रोख पुरस्कार व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.
रांगोळी स्पर्धेत प्रथम निहार जिभकाटे, द्वितीय सुरेखा कुर्झेकर, तृतीय रंजनी भुरे, चतूर्थ श्रेया ठाकरे यांना देण्यात आले. त्यांना देखील अ‍ॅड. अवसरे यांचेहस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रभाकर लेपसे यांनी केले. संचालन डॉ. थेरकर आभार डॉ. तलमले यांनी मानले. दिप मेडीकल कोंढा, अनुराग मेडीकल कोंढा व डयगोन्स्टीक पॅथॉलॉजी लॅब, कोंढा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमास आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ता व विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Hope workers, nurse staff work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.