शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:04 AM2019-07-15T01:04:23+5:302019-07-15T01:05:01+5:30

पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.

Horticulture Minister's directive to remove pending panchamine | शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढण्याचे फलोत्पादन मंत्र्यांचे निर्देश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाचे दिवस असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जोमाने कामास लागावे, तसेच शेतकऱ्यांचे प्रलंबित पंचनामे निकाली काढावे, असे निर्देश फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिले.
राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर शनिवारी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. भंडारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय फलोत्पादन व रोजगार हमी योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी शांतनु गोयल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभिमन्यू बोदवड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, कृषी विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ना. जयदत्त क्षीरसागर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये एमआरजीएस अंतर्गत कामे, सीमेंट रस्ते, पांदण रस्ते याबाबत माहिती जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिली. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत ३३ कोटीचे पेंमेट देण्यात आले असून ३५ लाख मनुष्य दिवस काम करण्यात आले. जिल्ह्यात योजनेंतर्गत १४५२ कामे करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७० टक्के असून ४५ टक्के पºह्याची कामे झाली असल्याचे सांगण्यात आले. पीक विमा योजनेंतर्गत ५३ हजार लाभार्थी आहेत. खरीप हंगामात ४०० कोटी उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले असून २५० कोटी वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अग्रेसर असून राष्ट्रीयकृत बँकेचाही यात सहभाग आहे. यावेळी कृषी विभागांतर्गत झालेल्या भाऊसाहेब फुंडकर फळ लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा घेण्यात आला.

Web Title: Horticulture Minister's directive to remove pending panchamine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी