शॉर्ट सर्किटमुळे घर जळाले
By admin | Published: March 26, 2017 12:21 AM2017-03-26T00:21:12+5:302017-03-26T00:21:12+5:30
येथील वैजेश्वर वॉर्डातील रहिवाशी सुरेश लहुजी काटेखाये यांचे फर्निचर व्यवसाय असलेले घर विद्युत शॉर्ट सर्किटमुळे ...
पवनी :येथील वैजेश्वर वॉर्डातील रहिवाशी सुरेश लहुजी काटेखाये यांचे फर्निचर व्यवसाय असलेले घर विद्युत शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारच्या रात्री ११.३० वाजताचे सुमारास जळाले. या आगीत दोन लाखापेक्षा अधिक रूपयाचे नुकसान झाले.
घरासमोर असलेल्या जुन्या घरात फर्निचर बनविण्याचे काम सुरू होते. घराला आग लागल्याची माहिती शेजारच्या रूपाली भिवगडे यांनी कुटूंबियांना दिली. आरडाओरड सुरू झाल्याने वॉर्डातील तरूणांनी शेजारच्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात येईपर्यंत घरातील दुचाकी, दोन सागवान दिवाण, एक सोपा, कटर मशीन, राऊटर मशीन, ड्रील मशीन, झिंगझॉग मशीन, दोन लाकडी आलमाऱ्या, मोठी ताडपत्री, गोणा, एक ते दीड ट्रॅक्टर कापून ठेवलेला सागवान चिराण असे साहित्य जळून खाक झाले. घराचे फाटे, दवाखना, खिडक्यासुद्धा जळाल्या. यात दोन लाखापेक्षा अधिक रूपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळाचा पंचनामा तलाठी, विद्युत विभागाचे अधिकारी व पोलिसांनी केला. आर्थिक मदत मिळावी, अशी या कुटुंबियांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)