भंडारा कारागृहात मन परिवर्तन सभा
By Admin | Published: April 3, 2016 03:49 AM2016-04-03T03:49:48+5:302016-04-03T03:49:48+5:30
कैद्यांनो आपले पाप कबुल करा आपण जे पाप केले ते पाप ईश्वराजवळ कबुल करा पुर्ण मनाने खरा पश्चाताप करा ...
भंडारा : कैद्यांनो आपले पाप कबुल करा आपण जे पाप केले ते पाप ईश्वराजवळ कबुल करा पुर्ण मनाने खरा पश्चाताप करा आपण ज्याचेवर अन्याय केले त्यांना क्षमा मागा. गुन्हा करू नका. गुन्हा करून काहीच मिळत नाही. फक्त वाट्याला दु:ख येत असतो.
आपण जन्मता गुन्हेगार नाही. आपण नक्की बदलु शकता, असे प्रतिपादन युनिवर्सल हायस्कूल लाखनीचे प्राचार्य एम.एस. साजन यांनी केले. कारागृहात मन परिवर्तनचे कार्यक्रमात ते बोलत होते. मनिष गोस्वामी म्हणाले, गडचिरोलीत ५९ नखलवादी यांनी आत्मसमर्पन केले असे करणे शक्य वाटत नव्हते परंतु ते शक्य झाले. आत्मसमर्पन नक्षलवादी यांना कळले आहे गुन्हेगारी करून काहीच मिळत नसते. त्यांनी आपले अनुभवात फार दु:ख सोसले आहेत. गुन्हा करू नका. यानंतर अर्पन गोस्वामी, ईमॅनुल दास, शेफान साजन कारागृहात उत्कृष्ट मोटिवेशनल संगित सादर करून कैद्यांना मार्गदर्शन केले. यानंतर कारागृह अधीक्षक अनुप कुमारे कुमरे म्हणाले, व्यसन करू नका. मन परिवर्तन टिम द्वारा अखेर कैद्यांकडून गुन्हा न करण्याची शपथ घेण्यात आली. (प्रतिनिधी)