पूरग्रस्त बपेरा पुनर्वसन स्थळातील घरकुल दहा वर्षात झाले जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:45+5:302021-09-27T04:38:45+5:30
२६ लोक मोहन भोयर तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे ...
२६ लोक
मोहन भोयर
तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे पुनर्वसन २०१०- २०११ मध्ये करण्यात आले. परंतु अवघ्या दहा वर्षात सदर घरकुल जीर्ण झाले असून घरकुलाची गच्चीला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅब कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे जीव मुठीत घेऊन १२५ कुटुंबीय वास्तव्य करीत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत पूरग्रस्त कुटुंबांवर पुन्हा बेघर होण्याची वेळ आली आहे.
बपेरा गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडून सन २००७-२००८ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१०-२०११ पर्यंत घरे बांधून पूर्ण झाली व पूरग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात आला.परंतु अवघ्या दहा वर्षातच घरे जीर्ण झाली. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक घरकुलात वास्तव्य करावे लागत आहे. तुमसर वाराशिवनी राष्ट्रीय महामार्गावर बापेरा हे गाव असून दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी गावात शिरते. त्यामुळे येथील सुमारे दीडशे घरांना त्याचा फटका बसतो. सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी नदीचे पाणी गावात शिरले होते व अनेक घरांची पडझड झाली होती. बेघर झालेल्यांना राज्यशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुल बांधून दिली. परंतु घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे सदर घरकुलांना अवघ्या दहा वर्षातच गळती लागली आहे. शौचालय निरुपयोगी ठरले आहेत. गडर नाल्या यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले नाहीत. त्यांच्या घरांचे पट्टी अजून पर्यंत विद्यार्थी होणार नाही येथे योग्य रस्त्याचे बांध काम करण्यात आले नाही. अनेकांच्या घरी अजूनही वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच वास्तव्य करावे लागते.
बाधितांनी या संबंधीची तक्रार लोकप्रतिनिधी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी अजूनपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली पाहणी: बपेरा येथील पुनर्वसन स्थळाला माजी खासदार पटले यांनी भेट दिली व पुनर्वसन स्थळी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून अत्यंत विदारक परिस्थितीत येथील नागरिक वास्तव्य करीत असल्याचे त्यांना आढळले.
यावेळी देवानंद लांजे, बपेरा च्य सरपंच ममता राऊत,डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खंगार, अरविंद पटले, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरा उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, चेतन रहांगडाले, गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहन पारधी, नीलेश गोंडाने, सुनील शिवणे, झनक पटले, रवींद्र रहांगडाले,उमेश गजभिये, हिरालाल सहारे, लोकेश बम्हणोटे, सचिन रहांगडाले, सुनील पटले, संतोष गौतम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.