भंडारा शहरात पायी चालायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 05:00 AM2021-08-22T05:00:00+5:302021-08-22T05:00:34+5:30

अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध वाॅर्डात अनेक घरमालकांनी आपल्या घरासमोर असलेल्या जागा बांधून काढल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्या घरासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी कसरतीचे ठरत आहेत.

How to walk in Bhandara city? | भंडारा शहरात पायी चालायचे कसे ?

भंडारा शहरात पायी चालायचे कसे ?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत भंडारा शहरातील बाजारपेठेत विविध खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, दिवसेंदिवस शहरातील मोठा बाजार परिसरासह अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यांवर झालेले अतिक्रमण आणि प्रमुख रस्त्यावरच विक्रेते दुकाने लावून बसत असल्याने पायी चालणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 
भंडारा शहरात ग्रामीण भागातील अनेक नागरिक खरेदीच्या निमित्ताने येत असतात. मात्र, अशावेळी वाहने उभी करायची कोठे असा प्रश्न उभा राहतो. अत्यंत अरुंद रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांची कसरत होत आहे. ही अनेक वर्षांपूर्वीची परिस्थिती असतानाही भंडारा नगरपरिषद मात्र याकडे डोळेझाक करत आहे. त्यामुळेच हे चित्र बदलताना दिसत नाही. नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील विविध वाॅर्डात अनेक घरमालकांनी आपल्या घरासमोर असलेल्या जागा बांधून काढल्या आहेत. या व्यतिरिक्त आपल्या घरासमोर रस्त्यावर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी कसरतीचे ठरत आहेत.  त्यामुळे धोका वाढला आहे. 

अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची मागणी
- भंडारा नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक तसेच मुस्लीम लायब्ररी चौक राजीव गांधी चौक व खात रोड वर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. भंडारा नगरपरिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास
- भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारे वाहने याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र, याबाबत भंडारा नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शहरातील फूटपाथ नावालाच
- भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फूटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून रहदारीसाठी रस्ता अरूंद ठरत आहे.  त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे नगर परिषद प्रशासनाचे  दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

भंडारा शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, बसस्थानक, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरूंद रस्त्यावरून जाताना समोरून येणारे वाहन आपल्याला धडक मारते की काय असा भास होतो.
- विवेक मेश्राम, भंडारा

 

Web Title: How to walk in Bhandara city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.