मोठ्या बाजार परिसरात पादचाऱ्यांनी पायी चालायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:45+5:302021-08-22T04:37:45+5:30

बॉक्स जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा ...

How to walk on foot in a large market area | मोठ्या बाजार परिसरात पादचाऱ्यांनी पायी चालायचे कसे

मोठ्या बाजार परिसरात पादचाऱ्यांनी पायी चालायचे कसे

Next

बॉक्स

जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास

भंडारा शहरातील मोठा बाजार परिसरात शहरातील नागरिकांसह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची दररोज ये-जा सुरू असते. विशेष म्हणजे वरठी, तुमसरकडे जाणारे वाहने याच मार्गाने जात असल्याने या मार्गावर अनेकदा गर्दी असते. यासोबतच रविवार आणि बुधवारी गर्दीने वाहतूक कोंडी होते. मात्र, याबाबत भंडारा नगरपरिषद, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

बॉक्स

शहरातील फूटपाथ नावालाच

भंडारा शहरातील बसस्थानक ते गांधी चौक, मुस्लीम लायब्ररी चौक, खात रोड परिसरात प्रमुख रस्त्यांवर असलेले फूटपाथ हे कागदावरच दिसून येत आहेत. या प्रमुख रस्त्यांवर दुकानदारांनी अतिक्रमण केले असून रहदारीसाठी रस्ता अरूंद ठरत आहे. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र, याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

बॉक्स

अतिक्रमण हटाव मोहीम राबवा

भंडारा नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक ते गांधी चौक तसेच मुस्लीम लायब्ररी चौक राजीव गांधी चौक व खात रोड वर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. अनेक दुकानांसमोर अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद होत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होते. याचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याची मागणीही जोर धरत आहे. भंडारा नगरपरिषदेने फिरत्या पथकाची नेमणूक करून अतिक्रमण केलेल्या जागांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कोट

भंडारा शहरातून पायी चालताना भीती वाटते. भंडारा शहरातून मोठा बाजार परिसर, बसस्थानक, खात रोड, खाम तलाव चौक परिसरात पायी चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न व अरूंद रस्त्यावरून जाताना समोरून येणारे वाहन आपल्याला धडक मारते की काय असा भास होतो.

विवेक मेश्राम, भंडारा

Web Title: How to walk on foot in a large market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.