जिल्ह्याला भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:13 PM2018-12-29T22:13:41+5:302018-12-29T22:13:55+5:30

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Huddhudi full of the district | जिल्ह्याला भरली हुडहुडी

जिल्ह्याला भरली हुडहुडी

Next
ठळक मुद्देथंडीचा कहर : १ जानेवारीपर्यंत अती तीव्र शीतलहर राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे तलावाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्याला हुडहुडी भरली आहे. तापमान कमालीचे खाली घसरल्याने प्रत्येक जण उब मिळविण्याचा प्रयत्न करीत असून उबदार कपड्याशिवाय कुणीही घराबाहेर पडत नाही. पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर १ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
गत दोन दिवसांपासून पारा सरासरीच्या खाली घसरल्याने थंडीत कमालीची वाढ झाली आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहत असल्याने हुडहुडी भरत आहे. रात्रीच्या वेळी तापमान प्रचंड घटत असल्याने कमालीची थंडी वाढली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे कडाक्याची थंडी पडली आहे. शुक्रवारी सकाळपासून थंड वारा वाहत होता. त्यामुळे दिवसाचे तापमानही खाली आले होते. शुक्रवारी दिवसभर कडक उन्ह असतानाही थंडी जाणवत होती. रात्रीच्या वेळी या थंडीत प्रचंड वाढ झाली. शनिवारी पहाटे वारा वाहत असल्याने थंडीत आणखी वाढ झाली. मात्र भंडारा शहराचे नेमके तापमान किती आहे हे नोंद होत नसल्याने कळू शकले नाही.
हुडहुडी भरणाºया थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण उबदार कपडे घालत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य आहे. दिवसभर शेकोटीचा आधार घेत अनेक जण दिसत होते. सायंकाळी थंडीत वाढ झाल्याने रस्त्यावरही शुकशुकाट निर्माण झाला होता. थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. हवामान खात्याद्वारे प्राप्त माहितीनुसार २९ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भात मध्यम ते अती तीव्र शीतलहर प्रभावित होणार असल्याचा अंदाज आहे.
या थंडीचा मनुष्यासोबतच प्राणीमात्रांवरही परिणाम होत आहे. अनेक पक्षी या थंडीमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर झोपणाऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. उब मिळविण्यासाठी शेकट्यांचा आधार घेत आहे. ही थंडी आणखी काही दिवस राहणार असल्याने अनेकांनी याचा धसका घेतला आहे.
तापमानासाठी मोबाईलचा आधार
भंडारा शहरात हवामान नोंद करण्याचे केंद्रच नाही. त्यामुळे येथील तापमानाची अधिकृत नोंदच होत नाही. प्रत्येक जण मोबाईलवरून तापमानाचा अंदाज घेत आहे. मोबाईलवरील तापमानानुसार भंडारा शहराचे शनिवारी कमाल २४ अंश सेल्सीअस तर किमान ८ अंश सेल्सीअस तापमान दर्शविण्यात आले होते. मात्र मोबाईलवरील तापमान अधिकृत नसल्याने भंडारा शहराचे नेमके किती तापमान आहे हे कळायला मार्ग नाही. शासकीय स्तरावर कुठेही नोंद होत नाही. तर भंडारा येथील जलसंपदा विभागाच्या हवामान केंद्रात शनिवारच्या तापमानाची नोंद ७.५ अंश सेल्सिअस झाली होती.

Web Title: Huddhudi full of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.