शिक्षणाने माणूस घडला पाहिजे - काशिवार

By admin | Published: January 22, 2017 12:35 AM2017-01-22T00:35:23+5:302017-01-22T00:35:23+5:30

शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे.

Human beings must be educated - Kashishvar | शिक्षणाने माणूस घडला पाहिजे - काशिवार

शिक्षणाने माणूस घडला पाहिजे - काशिवार

Next

लाखनी : शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे. माणूस घडला तर आपला देश विकसीत राष्ट्र म्हणून उद्याला येण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी व्यक्त केले.
समर्थ विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वाधिक तरुणांना देश म्हणून भारत जगात महासत्ता म्हणून उदयाला येणार असून युवाशक्तीच्या जोरावर देशाचे भवितव्य घडवायचे आहे असे काशिवार पुढे म्हणाले. स्नेहसंमेलानाच्या उद्घाटीका भाग्यश्री गिलोरकर यांनी स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी विविध घटक एकत्रितपणे कार्य करतात. यामुळे एकोपा व संघ भावना वाढीस लागते असे प्रतिपादन केले. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके, मनोरे, लेझीम नृत्य, योगासने सादर करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य उपस्थितांची दाद देवून गेली. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली मनाचे श्लोक विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचे आपल्या जीवनात पालन करून देशभक्त नागरिक बनावे, असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह न.ता. फरांडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी संकलीत केलेले उदय हस्तलिखीताचे प्रकाशन भाग्यश्री गिलोरकर यांनी केले. विद्यालयाच्या अहवाल वाचन विद्यार्थिनी प्रतिनिधी त्रिवेणी बिसेन हिने केले तर प्रास्ताविक प्राचार्य दिपक माने यांनी तर आभार संयोजक शालीकराम मडावी यांनी केले. कार्यक्रमास लाखनी पंचायत समितीच्या सभापती रजनीताई आत्राम, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, सदस्य बाळाजी रणदिवे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अध्यापक अक्षय मासूरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Human beings must be educated - Kashishvar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.