शेकडो पोती धान उघड्यावर

By admin | Published: December 21, 2015 12:36 AM2015-12-21T00:36:57+5:302015-12-21T00:36:57+5:30

सुरु असलेला आधारभूत धान खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेले हजारो पोती धान उघड्यावर व बेवारस स्थितीत पडून आहे.

Hundreds of bounty dances open | शेकडो पोती धान उघड्यावर

शेकडो पोती धान उघड्यावर

Next

धान बनले गुरांचा चारा : आॅर्डर मिळाल्याने आधारभूत केंद्र बंदच
राहुल भुतांगे तुमसर
सुरु असलेला आधारभूत धान खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीकरिता आणलेले हजारो पोती धान उघड्यावर व बेवारस स्थितीत पडून आहे. परिणामी केंद्रावरून धानाच्या पोती चोरीला जाण्याबरोबरच पोत्यातील धान गुरांचा चारा बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
तुमसर शहर व परिसरातील दहा ते बारा गावातील शेतकऱ्यांकरिता जयपुरिया भवन तुमसर येथे पार्वता बहु. सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित तुमसर या संस्थेला शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र देण्यात आले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर धान खरेदी केंद्र देण्यात आले. सुरुवातीपासूनच या केंद्रावर धान खरेदी सुरु झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आपले धान विक्रीकरिता केंद्रावर आणले व आणखीही आणणे सुरुच असताना अचानकच दहा दिवसाअगोदर कुणालाही काही कळण्याच्या आधी आधारभूत केंद्र संचालकामार्फत बंद करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांचे धान विक्रीकरिता केंदयावर आणणे सुरुच होते. केंद्र संचालकाने धान विक्रीला आणू नये किंवा कसे काय याबाबत सूचनाही लावल्या नव्हत्या. त्यामुळे केंद्राचा पटांगण धानाच्या पोत्यांनी भरला. धान केंद्रावर असल्याने आपला माल सुरक्षितच राहतो या अपेक्षेने शेतकरी चिंतामुक्त होता व रोज एक फेरी धान खरेदी केंद्रावर मारून केंद्र सुरु झाले किंवा नाही याची खातरजमा करीत होता.
मागील दहा दिवसापासून केंद्रावर किंवा त्या आवारात केंद्र संचालकांचा कोणताही इसम त्यांना दिसत नव्हता. आपला धान आज ना उद्या विकल्या जाईल या आशेने वाट बघत असलेल्या शेतकऱ्याची मात्र पुरती निराशाच झाली.
कारण बेवारस स्थितीत पडलेल्या धानाच्या पोत्यांचा कोणीही वाली नसल्याने रात्री अपरात्री धानाच्या पोती चोरीला गेल्याची तक्रार द्वार्वेकर नामक शेतकऱ्याने केली तर डोंगरला येथील पटले नामक शेतकऱ्याने १५० धानाच्या पोती आधारभूत केंद्रावर आणले होते. त्या केंद्राला कुंपण नसल्याने गुरे ढोरे नी आपला बसतात केंद्रावर मांडून अक्षरश: धानाची पोती फोडून ते खात असल्याने ५ ते १० पोती धान त्या शेतकऱ्याचे कमी झाले. केंद्रावर जर केंद्र संचालकाने सुरक्षा व्यवस्था ठेवली असती तर कदाचित हे अनर्थ टळले असते व शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लावला नसता एवढे निश्चित.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने करारनामा न झाल्याने (डी.ओ.) डिलेव्हरी आॅर्डर दिले नव्हते व गोदामाचीही क्षमता संपुष्टात आल्याने केंद्र मधात बंद ठेवावे लागले. परंतु डिलेव्हरी आॅर्डर मिळाल्याने लवकरच आधारभूत धान खरेदी केंद्र सुरळीत सुरु होईल.
- राजू गायधने
केंद्र संचालक,
आधारभूत केंद्र, तुमसर.

Web Title: Hundreds of bounty dances open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.