रोहणी परीसरातील शेकडो हेक्टरमधील धानपिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:29 AM2021-07-25T04:29:34+5:302021-07-25T04:29:34+5:30
तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम तालुक्यातील चौरास भागात करण्यात आले. काही प्रमाणात कालव्याचे बांधकाम ...
तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचे बांधकाम तालुक्यातील चौरास भागात करण्यात आले. काही प्रमाणात कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले असून कालव्यांच्या अन्य वितरीकांचे बांधकाम सदोष असल्याने चौरासातील शेतकऱ्यांना गत अनेक वर्षापासुन आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष व्यक्त केला जात आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात चौरासातील डाव्या कालव्याच्या वितरीकांचे बांधकाम करण्यात आले. मात्र बांधकाम सदोष असल्याने या वितरीका ठिकठिकाणी फुटुन त्यातील पाणी लगतच्या शेकडो हेक्टर क्षेत्रात शेतात शिरले आहे. त्यामुळे रोहणी परीसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पाणी शेतात शिरल्याने रोवणीपुर्ण झालेले धानपिक सडण्याच्या मार्गावर असून रोवणी शिल्लक असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी रखडल्याचे वास्तव आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कालव्यांच्या वितरीकांचे अर्धवट असलेले बांधकाम लवकर पुर्ण करावे, अशी मागणी रोहणी परीसरातील पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
240721\img-20210724-wa0027.jpg
रोहणी परीसरातील फुटलेली उपवितरीका