भंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:54 PM2017-11-17T13:54:05+5:302017-11-17T13:56:37+5:30

न्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत

Hunger strick by forest workers with family in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण

भंडारा जिल्ह्यात वनमजुरांनी कुटुंबियांसह सुरु केले आमरण उपोषण

Next
ठळक मुद्देवनविभागाकडून दुर्लक्षउपोषणात लहान मुलांचाही समावेश

आॅनलाईन लोकमत
भंडारा : न्यायालयाच्या आदेशाला वनाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून २१ वनमजुरांवर अन्याय केला. त्याविरोधात वनमजूर कुटुंबियांसह साकोली येथील वनकार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणात वनमजुरांची लहान मुलेही सहभागी आहेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असला तरी उपोषणाची वनविभागाने दखल घेतलेली नाही.
उपोषणकर्ते हे वनमजूर म्हणून वनविभागात कार्यरत होते. सन २०११ मध्ये या २१ वनमजुरांना वनविभागाने कायमचे बंद केले होते. त्यांच्या ठिकाणी इतर ३० ते ३५ वनमजूर कामावर ठेवण्यात आले. ते वनमजूर आजही कामावर आहेत. त्यामुळे अन्यायग्रस्त वनमजुरांनी भंडारा कामगार न्यायालयात दाद मागितली होती. कामगार न्यायालयाने ३० आॅगस्ट २०१७ रोजी या २१ वनकामगारांना पूर्ववत रूजू करण्याचे व थकीत वेतन देण्यात यावे, असा आदेश दिला. या आदेशान्वये वनाधिकाऱ्यांना आदेशाची प्रत देऊन स्वतंत्र अर्ज सादर केला. मात्र अजूनपर्यंत या कामावर घेण्यात आले नाही. परिणामी वनमजुरांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणादरम्यान एखाद्या वनमजुराने आत्महत्या केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही वनविभागाची राहील, असेही निवेदनात नमूद आहे. या उपोषणात वनमजुरांचे कुटुुंबिय सहभागी असून लहान-लहान मुलांचा यात समावेश आहे. या आंदोलनात प्रकाश वैद्य, कृष्णा गौतम, रेकचंद राणे, चंद्रशेखर पटले, माणिकराव चौधरी, उमेद रहांगडाले, टेकचंद राणे, नूतनलाल गौतम, कामेश्वर पारधी, शामलाल कांबळे, चंद्रभान गौतम, ब्रिजलाल ठवरे, गणेश भगत, राजेश पंधरे, शामसुंदर रामटेके, गणेश शहारे, तेजराम कुंभरे, संतोष मेश्राम व महादेव कटरे या वनमजुरांचा त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

Web Title: Hunger strick by forest workers with family in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.