उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:11 AM2019-06-16T01:11:53+5:302019-06-16T01:12:14+5:30
उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे.
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : उठा रे बाळानों सकाळ झाली. झोपू देनं ग आई, आई चाय झाला का. भूख लागली जेवायला दे, असा आईशी होणारा दररोजचा संवाद व हाक देणारी शिवलालची दोन पोर रुग्णालयात उपचार घेत आहेत. हक्कासाठी लढणाऱ्या या पोरांच बालपण प्रशासनात हिरावून घेतलं आहे.
बालपण म्हणजे मस्ती, मजा, ना काळजी, ना चिंता, बिनधास्त असं वावरण पण, मानवी प्रकोपाने मौजमजेचे दिवस जाणीवपूर्वक हिरावले जातात. तेव्हा सगळं बालपण आपूसकच बाजूला सारलं जात असते. अगदी असचं घडलं सिरसोली येथील शिवपाल लिल्हारे यांच्या दोन पोरांसोबत. महसूल प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायतने शिवलालचं लिल्हारेचा घर उध्वस्त केला. या घटनेमुळे शिवलालचे कुटुंब बेघर झाले. एका क्षणात संसार उघड्यावर आणले गेले. शिवलाल आता खचून गेला आहे, पण अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शिवलालची समीर व सतीश ही अल्पवयीन मुले पुढे आली. आधी तीन दिवस उपोषण त्यांनी केलं. पदरात काही पडल नाही. पून्हा ही दोघे भावंडे १३ जून रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषणावर बसली. बालपण, हुदंडण्याच, खेळण्याच मौज मस्ती असं भरलेलं असतं. पण मागील पंधरवाड्यापासून या दोघा मुलांचे बालपण निर्दयी प्रशासनाने हिरावून घेतले आहे.
दोन तीन वेळा जेवण करणारी ही लहान बालके दोन दिवस उपाशी होती. त्यांना शुक्रवारच्या सायंकाळी अस्वस्थ वाटू लागले. समीर व सतीशला मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आल आहे. रानात फिरणाºया बालकांना रुग्णालयाच्या खाटेवर जाण्याची वेळ प्रशासनात आणली आहे. सतीश हा नववीला गेला तर समीर शालांत परीक्षा उत्तीर्ण होवून अकरावीत जाणार आहे. या दोघांच सगळे कागदपत्र उध्वस्त घराच्या मलब्यात दबली आहेत, की कुठे याचा थांगपत्ता त्यांना नाही.
त्या दोन भावंडासमोर एकच प्रश्न उभा झाला आहे तो हक्काच्या निवाºयाचा. आमच हक्काच घर कधी उभं राहिल या न्यायासाठी आज ही दोन पोर शांततेच्या मार्गाने उपोषण करुन लढत आहेत. अतिक्रमणाच्या नावाने घर पाडल गेलं. पण, सिरसोलीत एकाच परिवाराचे अतिक्रमण अडचणीचे होते काय हा प्रश्न आता विचारला जात आहे. प्रशासनाने नियमानुसार घर पाडले हे खरे असलेही पण, घर पाडणे हा पर्याय नव्हताच, अनेक मार्ग काढता आले असते.
गावचा राजकारण, सत्तेची धुंदीने शिवलालच्या घरावर जेसीबीचा पंजा चालवला गेला. या पंज्याने पूर्ण परिवार दु:खी झाला आहे.
प्रशासनाने मानवीय हित बघितले नाही. कोणाच्या तरी इशाºयावरुन स्थानीक प्रशासनाला साथ दिली. द्वेष व दहशतीचा राजकारणाने सिरसोली गाव दुभंगला गेला आहे.
गावात शांत वादळ निर्माण होतोय इथे आता शिवलाल बाजूला सारला गेला काय अशी परिस्थिती दिसू लागली आहे. दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये शक्ती परीक्षा चालली आहे. पण, या वादात भरडले जात आहेत शिवलालचे कुटुंब, त्यापेक्षा अधिक चिंताग्रस्त झाली आहेत ती दोन मुलं. आमच पुर्वीसारख सुखरुप होईल या आशाळभूत नजरेन ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे बघत असतात. तर कधी नेत्यांकडे पण, कठोर काळजाच्या प्रशासनाने मानवी मन मृत केलयं. त्यामुळे आता, पुढच्या आशेचा किरण कधी उजाडतोय याची प्रतीक्षा समीर व सतीश ही लहान पोर न्याय हक्कातून करीत आहेत.