शिकारी व ट्रॅक्टर वनविभागाला सापडलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:24 PM2018-05-26T23:24:12+5:302018-05-26T23:24:42+5:30

वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

The hunter and the tractor forest section could not be found | शिकारी व ट्रॅक्टर वनविभागाला सापडलाच नाही

शिकारी व ट्रॅक्टर वनविभागाला सापडलाच नाही

Next
ठळक मुद्देप्रकरण वलमाझरी जंगलातील रानगव्याच्या शिकारीचे : साकोली तालुक्यात शिकारीच्या प्रमाणात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
२५ मे रोजी दुपारी वलमाझरीच्या जंगलात एका रानगव्याची विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने शिकार करून मृत रानगवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणून फेकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्या रानगव्याला तिथेच खड्डा खोदून पुरण्यात आले.
या घटनेला तब्बल दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी रानगव्याची शिकार करणारे व शिकारीनंतर या रानगव्याला ज्या ट्रॅक्टरने सोडण्यात आले त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास वनविभागाला अपयश आले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शिकाºयाच्या शोधात पिटेझरी, वलमाझरी, तुडमापूरी, वडेगाव अशा विविध गावी व विविध ठिकाणी शिकाºयांच्या शोधात फिरत असले तरी शिकारी व वाहनाचा अद्याप शोध लागला नाही.
शिकारीच्या प्रमाणात वाढ
साकोली तालुक्यात वनविभागाची यंत्रणा मजबूत असतानाही तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेवर गदा आली आहे. या शिकारीवर आळा बसणे गरजेचे आहे.
वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
यावर्षी अत्यल्पपावसामुळे जंगलातील पाणीसाठी ओस पडले. परिणामी वन्यप्राणी पाण्यासाठी सैरावैरा पळत असून गावाकडे धाव घेतात व शिकारीला बळी पडतात.
मुख्यालयी राहात नाही
वनाच्या रक्षणाकरिता वनविभागाने वनकर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्या वनकर्मचाºयांना मुख्यालय नेमून दिले आहे. मात्र वनकर्मचारी मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात. त्यामुळे अवैध वृक्षकटाई व शिकारीत वाढ होत आहे. तसेच फिरते पथकही कुचकामी ठरत आहे.

Web Title: The hunter and the tractor forest section could not be found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.