कृषिदूतांकडून भातपिकावर येणाऱ्या रोगांची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:43 AM2021-09-09T04:43:06+5:302021-09-09T04:43:06+5:30
लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येते. या पिकावर प्रामुख्याने येणारी कीड व रोगांची जाणीव असणे खूप ...
लाखांदूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करण्यात येते. या पिकावर प्रामुख्याने येणारी कीड व रोगांची जाणीव असणे खूप आवश्यक आहे. त्याकरिता विविध कृषिदूतांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन कीड व रोगांची ओळख करून दिली. सोबतच संबंधित रोगांवर उपाययोजना म्हणून विविध प्रकारच्या घटकांची माहिती दिली. औषधाच्या फवारणीसंबंधाने मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सेवकभाऊ वाघाये पाटील कृषी महाविद्यालय लाखनीचे कृषिदूत दयाल दर्याव धनविजय, कृषी महाविद्यालय सोनापूर गडचिरोली येथील कृषिदूत जयपाल गुलाब राऊत व धनेश्वरी मानव विकास मंडल कृषी महाविद्यालय गेवराई औरंगाबादचे कृषिदूत हेमंत नृपराज डिब्बे, सोबत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील कृषिदूत नरेश दशरथ खरकाटे, कृषी सहायक अतुल देशमुख व सोबत परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
080921\1457-img-20210908-wa0017.jpg
ऊपस्थित शेतकऱ्यांना किडरोगांची माहिती देतांना कृषीदुत