जिल्ह्याची ओळख शैक्षणिक प्रगतीमुळेच

By admin | Published: February 3, 2015 10:50 PM2015-02-03T22:50:41+5:302015-02-03T22:50:41+5:30

जगामध्ये तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर मुळ भारतीयच आहेत. या मूळ भारतीयांच्या भरवशावर इतर देश प्रगतिपथावर आहेत. कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी अनेक दालने उघडली आहेत.

Identity of the district is due to educational progress | जिल्ह्याची ओळख शैक्षणिक प्रगतीमुळेच

जिल्ह्याची ओळख शैक्षणिक प्रगतीमुळेच

Next

साकोली : जगामध्ये तुम्ही कुठेही जा प्रत्येक क्षेत्रात उच्च पदावर मुळ भारतीयच आहेत. या मूळ भारतीयांच्या भरवशावर इतर देश प्रगतिपथावर आहेत. कारण त्यांच्याकडे शिक्षणासाठी अनेक दालने उघडली आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्याची ओळख सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीमुळेच आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफूल्ल पटेल यांनी केले. ते डॉ. ब्रह्मानंद करंजेकर यांच्या हिरक महोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पटेल म्हणाले, देशातील युवक तिकडे का जातात कारण तिथे शिक्षणाची आणि रोजगाराची संधी उपलब्ध आहे. उद्याचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर मुळात शिक्षणालाच प्रथम अग्रक्रम देला पाहिजे. जिल्ह्याच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्नशील आहोत. मात्र त्यासाठी पालकांनी आणि युवकांनी संधी द्यायला पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. डॉ. भानूदास कुलकर्णी, माजी आमदार मधुकर कुकडे, धनंजय मोहरकर व डॉ. वृंदा करंजेकर उपस्थित होत्या. सत्कार समितीचे पदाधिकारी यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. समितीच्या वतीने डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन प्रफुल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सत्कार मुर्ती डॉ. करंजेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार दुबे, सूत्रसंचालन प्रा. संजय निंबेकर, प्रा. रजनी गायधने, आभार प्रदर्शन प्रा. गिरीष लांजेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवचंद करंजेकर, प्रा. जितेंद्रकुमार ठाकूर, प्रा. दामोदर गोपाले, मुख्याध्यापक सुनिल सुपारे, लोकनाथ नवखरे, राकेश चकोले, प्रा. पुष्पराज झोड, रवि भोंगाने, निता टेंभरे, अनिरूद्ध अभ्यंकर, अरुणभाऊ उपरीकर, कल्पना उपरीकर, रूपलाल पारधी, विलास परुशरामकर, अमोल चांदेवार, संतोष सय्याम, प्रा. महेश कनोजे, किशोर बनकर, पवन कोसरे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Identity of the district is due to educational progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.