ढाब्यावर दारू प्याल तर पडतील बेड्या; चालकाला लाखोंचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 11:26 PM2022-10-29T23:26:15+5:302022-10-29T23:26:42+5:30
दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज आहे की नाही, हा प्रश्न पडताे. पैसे जास्त दिले की, काेणत्याही चायनीज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजरीत्या दारू उपलब्ध हाेत आहे. पण ढाब्यांवर दारू प्यायल्यावर बेड्या पडणार असून चालकाला लाखाेंचा दंड हाेणार आहे, पण ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर केव्हा हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा भंडारा पाेलिसांनी ढाबा चालकांवर माेठी कारवाई केली नाही. काेराेना काळ वगळता या ढाब्यांवर एकही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्य मार्गावरील ढाबे आणि शहरातील काही चायनीज सेंटरवर सर्रास दारू विक्री केली जाते. त्यामुळे कुठेही, कधीही दारू सहजतेने उपलब्ध हाेत आहे. त्यामुळे दारू विक्रीसाठी परवानाधारक दुकानाची गरज आहे की नाही, हा प्रश्न पडताे.
पैसे जास्त दिले की, काेणत्याही चायनीज सेंटरवर अथवा ढाब्यावर सहजरीत्या दारू उपलब्ध हाेत आहे. पण ढाब्यांवर दारू प्यायल्यावर बेड्या पडणार असून चालकाला लाखाेंचा दंड हाेणार आहे, पण ही कारवाई भंडारा जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावर केव्हा हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ढाबा चालकांवर कारवाई करणार कोण?
महामार्गावरील अनेक ढाब्यांवर रात्रीच्या वेळी दारूची विक्री लपूनछपून केली जाते, तर काही ठिकाणी बसून दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येते. पण याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करतात. या ढाब्यांवर स्थानिक पोलीसही कारवाई करीत नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभाग नाममात्र
भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूविरोधात कारवाई करण्यासाठी धजावत नाही. अवैध दारूविक्रेते व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे साटेलोटे तर नाही ना अशी शंका येते. या अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
नकली दारूकडे दुर्लक्ष, हातभट्टीवर कारवाई
भंडारा जिल्हा पोलीस विभागाने यापुर्वी हातभट्टी दारूविक्रेत्यांवर कारवाई करून आपली स्तुती करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आजही अवैध व नकली दारू जोमाने सुरूच आहे. यापुर्वी नकली दारूकडे दुर्लक्ष करून हातभट्टी चालकांवर हजारो कारवाया केल्या.
कोरोनाच्या काळात एकाच ढाब्यावर कारवाई
ढाब्यावर दारू पार्ट्या करणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक ढाब्यावर जिल्हा पाेलिसांच्या पथकाने कारवाई केली होती. परंतु अलीकडे अवैध दारू विक्री जोमात सुरू असली तरी कोणत्याच ढाब्यावर कारवाई झाली नसल्याचे कळते.
नकली दारूची सर्रास विक्री?
भंडारा जिल्ह्यात नकली दारूविरोधात दोन वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली. महिनाभरापूर्वी जिल्हा पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. परंतु असे अनेक नकली दारू गाळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.