मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो

By Admin | Published: November 4, 2016 01:00 AM2016-11-04T01:00:22+5:302016-11-04T01:00:22+5:30

विदर्भ समृद्ध आहे परंतू अखंड महाराष्ट्रात असल्याने विकासापासुन वंचित आहे .

If you have a desire to work hard and work hard, then any difficult task can be done with ease | मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो

मनात जिद्द आणि काम करण्याची ओढ असेल तर कोणताही कठीण कार्य सहजरित्या करता येवु शकतो

googlenewsNext

पवनीत विदर्भ दिंडी यात्रा : राम नेवले यांचे प्रतिपादन
पवनी : विदर्भ समृद्ध आहे परंतू अखंड महाराष्ट्रात असल्याने विकासापासुन वंचित आहे . विदभार्ची लूट करून पश्चिम महाराष्ट्र समृद्ध केला जात आहे. हे थांबवावयाचे असेल स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय विदभार्चा विकास शकय नाही असे प्रतिपादन विराआं समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ दिंडी यात्रा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात पवनी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शेतक?्यांची आर्थिक स्थिती सुधारणे ,बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे , पुरेशी व स्वस्त विज पुरवठा करणे , शंभर टक्के नोकरीतील वाटा मिळविणे या सर्वांसाठी स्वतंत्र विदभार्ची गरज ेआहे असे मत त्यांनी मांडले. यावेळी माजी आमदार व कोअर कमेटी सदस्य अ‍ॅड. आनंदराव वंजारी , भंडारा जिल्हा अध्यक्ष वासुदेवराव नेवारे , अर्जून सुर्यवंशी , उपाध्यक्ष दामोधर क्षिरसागर , युवा आघाडी अध्यक्ष राजु हटेवार यानी यावेळी विदर्भ विकासातील अडथळ्यावर भाष्य करून दि. ३० नोव्हे . ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित विदर्भ दिंडी यात्रेत मोठ्या सख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक व संचालन पवनी तालुका अध्यक्ष डॉ . विक्रम राखडे यांनी केले .
आभार राजु हटेवार यानी केले . यावेळी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते व गणमाण्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: If you have a desire to work hard and work hard, then any difficult task can be done with ease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.