सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 04:38 PM2024-07-11T16:38:44+5:302024-07-11T16:39:34+5:30

पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ : सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती

If you take precautions after snakebite, you can save your life! | सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

If you take precautions after snakebite, you can save your life!

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पावसाळ्यात विंचू व सर्पदंशाच्या घटना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रमाणात घडत असतात. सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास व खबरदारी घेतल्यास संबंधिताचा जीव वाचू शकतो. याबाबत सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. विषारी सापाच्या दंशावर तातडीने उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होतो. विंचूदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असले, तरी यामुळे प्रचंड त्रास होतो.


पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू ओलावा व अडचण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. शहरी भागातील नागरिकांनी घर व परिसरात, शेतकऱ्यांनी शेतात अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्पतज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.


महिन्याभरात शेकडो लोकांना सर्पदंश
• यावर्षी महिन्याभरात जिल्ह्यातील अनेक लोकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच गावठी उपचाराने काही जणांना जीवही गमवावा लागला.

विंचूदंशाच्या कित्येक घटना
• शेतात व परिसरात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना विंचूदंश झाल्याच्याही कित्येक घटना घडल्या
आहेत. जिल्ह्यात विचूदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत.


सर्वांत आधी काय कराल?
• सर्पदंशानंतर : रुग्णास झोपू देऊ नये. दंश झालेली जागा सेलपट्टी किंवा कपड्याने झाकावी; जेणेकरून विषप्रतिरोधक मिळू शकते. तातडीने औषधोपचार करावा.

• विंचूदंशानंतर : विंचूदंश झाल्यावर तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन औषधोपचार करावा; जेणेकरून संबंधिताचा त्रास कमी होईल. गावठी उपचार करू नये..

तज्ज्ञ काय म्हणतात...
पावसाळ्यात विषारी व बिनविषारी साप लोकवस्तीकडे येतात. साप घरात शिरू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. लोकवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना माहिती द्यावी.
- योगेश पशीने, सर्पमित्र, भंडारा.

साप किवा विंचवाने दंश केल्यास वेळीच नजीकच्या आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे; जेणेकरून उपचार वेळेत होईल आणि प्राण वाचतील. 
- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा.
 

Web Title: If you take precautions after snakebite, you can save your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.