मोफत दळण हवाय तर.. पूर्ण कर भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:39 AM2021-01-16T04:39:34+5:302021-01-16T04:39:34+5:30

कराच्या भांडवलावर ग्रामपंचायत गावाचा विकास करीत असते. ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर, सामान्य ...

If you want free grinding .. pay full tax | मोफत दळण हवाय तर.. पूर्ण कर भरा

मोफत दळण हवाय तर.. पूर्ण कर भरा

Next

कराच्या भांडवलावर ग्रामपंचायत गावाचा विकास करीत असते. ग्रामीण जनता मात्र इमारत कर, पाणीपट्टी कर, दिवाबत्ती कर, स्वच्छता कर, सामान्य आरोग्य आदी कर भरण्यास बेफिकिरी दाखवतात. काम अडलं तरच कर भरले जातात, हे वास्तव आहे. त्यामुळे गावाच्या विकासात खोडा, विघ्न येत असतात.

गावाची सुधारणा, प्रगती व्हावी, तसेच नियमित कर भरण्याची सवय गावकऱ्यांना लागावी, यासाठी करमुक्त झालेल्या कुटुंबियांना वर्षभर गहू, तांदूळ डाळ आदींचे दळण ग्रामपंचायतीच्या निधीतून मोफत करण्यात येणार आहे. तसा ठराव २८ डिसेंबरच्या ग्रामपंचायतीने मासिक सभेत एकमताने पारित केला आहे. मोफत दळण योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीने शर्थी लागू केल्या आहेत. १४ लाख ३४ हजार ७६२ रुपयांची मागणी आहे. दहा लाख ७१ हजार ४२० रुपयांची थकबाकी आहे. ग्रामपंचायतीने आतापर्यंत केवळ चार लाख ८३ हजार ९५१ रुपयांची कर वसुली झाली आहे. त्यामुळे कर भरा, दळण मोफत करा, ही योजना सुरू केली आहे.

३१ मार्चपर्यंत कर भरणाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. करदाते २०२१-२२ या वित्तीय वर्षात एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण कर भरतील, त्यांना वर्षभर दळण मोफत करून मिळणार आहे. यासाठी करदात्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यात कुटुंबातील सदस्यांची नावे राहणार आहेत.

करदात्यांना कर भरण्याची प्रेरणा मिळेल व गावाची प्रगती होण्यास भांडवल हातात येणार आहे. हरदोली ग्रामपंचायत विविध उपक्रमातून गावाला प्रगतीची दिशा देत आहे. त्यामुळेच या गावाला स्मार्ट गावचा यावर्षीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

बॉक्स

हरदोली ग्रामपंचायतअंतर्गत ६३२ करदाते आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ १४० करदात्यांनी कर भरला आहे. वर्षभर दळण मोफत ही योजना सुरू झाल्यानंतर कर भरण्यास वेग आला आहे.

कोट

गावात थकीत करांचा आकडा वाढत आहे. त्याचा परिणाम गाव विकासावर होत आहे. कर बुडवेगिरीला लगाम लावला जावा. करदात्यांना करप्रणालीमध्ये नियमित करावे. ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी हा नवीन प्रयोग राबवला जात आहे.

सदाशिव ढेंगे

सरपंच, ग्रामपंचायत हरदोली / झंझाड

Web Title: If you want free grinding .. pay full tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.