नवोदयच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:40 PM2018-10-01T21:40:47+5:302018-10-01T21:41:06+5:30
१७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : १७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला नवोदय विद्यालय लाभले. आधी भंडारा येथे समस्यांच्या विळख्यात असलेले नवोदय आता मोहाडी येथील माविमं इमारतीत हलविण्यात आले. येथे तरी सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील, अशी आशा होती. मात्र नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप, विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. याबाबतची माहिती पालकांनी सोमवारी दुपारी १ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पालक म्हणाले, २३ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर नवोदयच्या समस्यांकडे जिल्हा प्रशासन गांभीर्याने बघेल, अशी आशा होती. पालकांनीही या आंदोलनासाठी खूप संघर्ष केले. विशेष म्हणजे नवोदय विद्यालय माविमं इमारतीत पोलीस बंदोबस्तात हलविले याचे नेमके कारण अजुनपर्यंत पालक व संघर्ष समितीला कळले नाही. स्थानांतरणाच्या वेळी या इमारतीत पूर्ण सोयीसुविधा आहेत काय, अशी विचारणा जिल्हा प्रशासनासह मुख्याध्यापक अंबोरे यांना विचारण्यात आले होते. या इमारतीच्या सभोवतालचा परिसर स्वत: पालकांनी पुढाकार घेवून स्वच्छ केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना समस्याबाबत तीन वेळा निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाºयांसोबत चर्चाही करण्यात आली. मात्र पालकांच्या पदरी निराशाच पडली. यावर्षी मुलांना शालेय गणवेश व जोडे मिळालेले नाहीत. मुलांची आरोग्य तपासणीही झालेली नाही. मुलांच्या कक्षामध्ये पुरूष शिक्षका ऐवजी महिला शिक्षकाची नियुक्ती आहे. दीड वर्षांपासून मुख्याध्यापकांनी शालेय समिती स्थापन केली नाही. माविमंच्या इमारत परिसरात महिनाभरात चार विषारी सापही निघाले. स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालय व संगणक कक्षाची सोय अजुनपर्यंत झालेली नाही. २२ विद्यार्थ्यांसाठी दोन शौचालय व तीन स्रानगृह आहे. आंघोळीकरिता गरम पाण्याची सोय लवकर करण्यात येईल ही मागणीही अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी सदर नवोदय विद्यालय विद्यार्थ्यांसाठी शाप की वरदान, असा टोलाही यावेळी पालकांनी लवला.
पत्रकार परिषदेला भाऊ कातोरे, उमेश मोहतुरे, भगवान ढेंगे, प्रवीण उदापुरे, यशवंत भोयर, रोहित साठवणे, संजय मते, शशिकांत गजभिये, यशवंत टिचकुले, उषा कातोरे, शालिनी झोडे, विलास मोथरकर, योगिता लांजेवार, मंगेश वंजारी यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.