मातीला आकार देणाऱ्या कलावंताची उपेक्षा

By Admin | Published: November 19, 2015 12:32 AM2015-11-19T00:32:44+5:302015-11-19T00:32:44+5:30

घरची स्थिती हलाखीची अशातही स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय एका तरुणाने व्यक्त केला.

Ignore the artist who shapes the soil | मातीला आकार देणाऱ्या कलावंताची उपेक्षा

मातीला आकार देणाऱ्या कलावंताची उपेक्षा

googlenewsNext

शून्यातून साकारले विश्व : तिड्डी येथील तरुणाने जागविला आत्मविश्वास
भंडारा : घरची स्थिती हलाखीची अशातही स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय एका तरुणाने व्यक्त केला. परंतु प्रपंचाच्या समोर या तरुणाला हतबल व्हावे लागले. मातीला आकार देण्याची कला अंगी होती. त्यातच त्याने विश्व रमवून काम केले. पाहता पाहता अनेकानेक मूर्ती हातून घडत गेल्या. शून्यातून कलावैभव साकारणारा हा तरुण तिड्डी येथील आहे. अमर बोरसरे असे या कलावंताचे नाव असून मदतीच्या अपेक्षेत आजही तो वाट बघत आहे.
जन्मजात कोणताही गुण अंगी असला तर तो वाया जात नाही. अशीच प्रचिती या तरुणाने करुन दिली आहे. आंभोरा तिर्थक्षेत्राचा ऐलतिरी वसलेल्या मानेगाव जवळील तिड्डी (डोह) येथील मूर्तीकार अमर गोपाल बेलसरे याने मानेगाव येथील चैतन्य विद्यालयातून माध्यमिक शिक्षण घेतले. वडीलोपार्जित माठ बनविण्याचा व्यवसाय आहे. मात्र त्याने देवीदेवतांचा मुर्ती साकारण्याला प्रारंभ केला. माता पार्वती, महादेव, श्रीगणेश, नवदुर्गा, राधा-कृष्ण, साईबाबा यांची हुबेहुब प्रतिकृती तयार करुन असंख्य कलावंतानाही मागे टाकले. त्याच्या या कलेची गावात प्रशंसाही झाली. मात्र महागाईच्या युगात मुर्ती घडविण्यासाठी सतत झडावे लागले. कुंभार समाजाला अच्छे दिन येतील या अपेक्षेपोटी हा तरुण सतत प्रयत्न करीत राहील.
शिक्षणाची आवड असल्याने अमरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण घेतले. समोर स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून देशसेवा करण्याचा मनोदय अमरने व्यक्त केला आहे. यासाठी तो दररोज पहाटे ४ वाजतापासून अभ्यास सरावही करतो.
यानंतर फिरत्या चाकावर मातीपासून भांडी बनवून उदरनिर्वाह चालवित आहे. अमरसारख्या उमदया कलावंताना शासन व प्रशासन आर्थिक बळ देवून त्यांचे स्वप्न पूर्ण करणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ignore the artist who shapes the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.