जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:01 PM2017-08-16T23:01:41+5:302017-08-16T23:03:04+5:30
शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकºयांच्या आत्महत्या, पाण्याचा गंभीर प्रश्न, चाºयाचा प्रश्न यासारख्या जिल्ह्यातील ज्वलंत समस्या नागरिकांपुढे आ वासून उभ्या असताना शासन प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून कुठलाही वर्ग सुखी व समाधानी नाही. याला शासन जबाबदार आहे असा आरोप खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी केला.
दुपारी १२ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ओबीसी स्कॉलरशिप, आपादग्रस्त शेतकºयांना मदत, कर्जमाफीचा सरसकट लाभ ही बाब सर्वसामान्यांसह सर्वांनाच संभ्रमात घालणारी आहे. पिक विम्याची स्थिती फार वाईट असताना खासगी कंपन्याही शेतकºयांचे ऐकत नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पिक विम्याचा किती लाभ मिळाला याची आकडेवारी पाहिल्यास हे समजून येईल. दुष्काळाच्या स्थितीबाबत बोलताना पटेल म्हणाले, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. कृषीपंपांना नियमित वीज नाही. पावसाने पाठ फिरविल्यामुळे भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार आहे. प्रकल्पामध्ये पाण्याचा साठाच नसल्याने सिंचनाला पाणी तरी कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत सत्तेतील पदाधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. येत्या आठवडाभरात पाऊस न बरसल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थितीला अजून हातभार लागणार आहे. पालिकेत विरोधकांची भूमिका जोरदार वठवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. जिल्हा महिला रुग्णालयाच्या मुद्यावर प्रशासनातील मंत्री, अधिकारी बोलायला तयार नाहीत. अच्छे दिनाच्या नावावर सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याचाही घणाघाती आरोप खा.पटेल यांनी लावला.
पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, ज्येष्ठ नेते धनंजय दलाल, सभापती नरेश डहारे आदी उपस्थित होते.