संगणक शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची उपेक्षा
By admin | Published: January 31, 2015 12:40 AM2015-01-31T00:40:21+5:302015-01-31T00:40:21+5:30
तुमसर तालुक्यातील आदीवासी बहुल खापा (खुर्द) येथे शासकिय पोस्ट बेसीक आश्रमशाळा आहे.
आलेसुर : तुमसर तालुक्यातील आदीवासी बहुल खापा (खुर्द) येथे शासकिय पोस्ट बेसीक आश्रमशाळा आहे. येथील आश्रम शाळेत सन २०१४ ते २०१५ सत्रात किमान (कंत्राटी) संगणक शिक्षकही उपलब्ध नाही या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञान व विकास कार्यानुभव या विषयात सर्रास उपेक्षा केली जात आहे. त्यांची माहिती व तंत्रज्ञान या विषयात पिछेहाट केली जात आहे. या शासकिय पोस्ट बेसीक आश्रम शाळेची स्थापना सन १९८२ ला झाली असून ३३ वर्षाचा कालखंड लोटला आहे. मात्र अलिकडील काही काळात दर्जात्मक शिक्षणाअभावी विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत असुन आदीवासी पालकांचा कल खाजगी अनुदानीत आश्रमशाळेत वाढला आहे. परिणामी या शासकिय आश्रमशाळेचे भवितव्य धोक्यात आले आहे.
सध्या या आश्रमशाळेत २१० विद्यार्थ्यांची पटसंख्या असुन इयत्ता ५ वी ते १० वी मधिल पटसंख्या ९२ आहे. बालकांचा मोफत व शक्तिचा शालेय शिक्षण कायद्यान्वये व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात इयत्ता तंत्रज्ञान व विकास कार्यानुभव असा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिदिन वेळापत्रकाच्या पुरक नियोजनान्वये किमान १ ते २ तास संगणक शिक्षणाचे ज्ञान देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन गतिमान युगात संगणक व त्यांचे आयुष्यातील महत्वाचे स्थान, संगणकाची व्यवस्था मुख्यभाग, इनपुट, प्रोसेस, आऊटपुट, किबोर्ड, माऊस, सीपीयु मॉनिटर, प्रिंटर, किज, फंक्शन व अनेक महत्वपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. अध्यापनासमावेत कार्यानुभव करणे गरजेचे आहे. मात्र संगणक कक्षात ६ पैकी २ संगणक सुरु असून ४ संगणक पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे शाळा व देखभाल दुरुस्तीचा निधी कुठे अलिप्त झाला हा पालक वर्गानी प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे शिक्षणातील मुख्य गाभा शिक्षक नसल्यामुळे संगणीक विकास किती झाला असेल हे उहापोह ठरेल.
परिक्षा तोंडावर
इयत्ता १० मधील शालांत परिक्षा मार्च २०१५ मधिल वेळापत्रक घोषित झाला असून २० मार्च २०१५ ला माहिती संप्रेषण तंत्रज्ञान चा लेखी व प्रात्यक्षीक पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक तयारी कितपत सज्ज असेल या विषयी कल्पना करणे आतिषयोक्ती ठरेल. (वार्ताहर)