आंतरराज्यीय सीमेवरील प्रवाशी निवारा दुर्लक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:40+5:302020-12-27T04:26:40+5:30
लोकप्रतिनिधीनी येथे नव्याने प्रवासी निवारा मंजूर करण्याची मागणी आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावरील प्रत्येक गावांत लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास ...
लोकप्रतिनिधीनी येथे नव्याने प्रवासी निवारा मंजूर करण्याची मागणी आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावरील प्रत्येक गावांत लोकप्रतिनिधीच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रवासी निवारे मंजूर करण्यात आले आहेत. प्रवाशांचे सोई करीता प्रवाशी निवारे बांधकाम करण्यात आले असली तरी सुविधा नाहीत. प्रवासी निवारे मंजूर करताना प्रसाधनगृह नियोजीत करण्याची ओरड जुनीच आहे. प्रवासी निवारे मंजूर करतांना अंदाजपत्रकात या सुविधांची तरतूद करण्यात येत नाही. यामुळे महिला, पुरुष प्रवाशांची गैरसोय होत आहे.
प्रवासी निवारा, झाडांचे आडोसे प्रसादन गृह म्हणून प्रवासी उपयोग करीत आहेत. यामुळे विशेषतः महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे. राज्य मार्गावर गावांचे हद्दीत बांधकाम करण्यात आलेली प्रवासी निवारे नंतर ग्राम पंचायतला हस्तांतरित करण्यात येत आहेत. या प्रवासी निवाऱ्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्राम पंचायतच्या खांद्यावर आहे. परंतु ग्राम पंचायतकडे निधी उपलब्ध राहत नसल्याने देखभाल व दुरुस्ती करण्याकरिता पुढाकार घेण्यात येत नाही. या प्रवासी निवाऱ्याची स्वच्छता कुणी करावी, हा गंभीर विषय आहे. ग्राम पंचायती गांभीर्याने घेत नाही. ग्राम पंचायतमध्ये स्वच्छता करणारे कर्मचाऱ्यांचे पद नाही. केंद्र आणि राज्य शासन स्वच्छता अभियानावर भर देत आहे,