अवैध व्यावसायिकांकडून ४४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:16 PM2018-07-15T22:16:09+5:302018-07-15T22:16:53+5:30
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केले.
जुगार कायद्याखाली पोलीस स्टेशन भंडारा व लाखनी येथे ३ गुन्हे नोंद केले असुन आरोपीतांकडून एकूण ३,९१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तसेच पोलीस स्टेशन सिहोरा आणि लाखनी येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्याखाली एकूण चार गुन्हे नोंद केलेले आहेत.
एकूण १ लक्ष ७ हजार ९२२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे रेतीची अवैध वाहतूक करणाया दोन ट्रक चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन २० लक्ष ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
तसेच पोलीस स्टेशन कारधा व लाखनी येथे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहन चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन २३ लक्ष ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व रेड स्कॉड पथकाने अवैध व्यवसायिकांविरुद्ध कारवाई करुन एकूण ४४ लक्ष ८७ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
त्याचप्रमाणे भंडारा येथे गांजा विक्री करणारा नामे जाकीर शेख रा. बैरागी वाडा याचे विरुध्द पोलीस स्टेशन भंडारा येथे एन. डी. पी. एस. कायदयाविरुध्द गुन्हा नोंद करुन त्यास अटक केलेली आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सपोनि काळे, पोटे, पोलीस उपनिरीक्षक आडोळे आणि त्यांच्या पथकाने केली.
माहिती देण्याऱ्यांचे नाव ठेवणार गोपनीय
जिल्ह्यात लपुनछपुन सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबतची माहिती नियंत्रण कक्ष भंडारा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला देण्याबाबत पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी जनतेला आवाहन केले असुन माहिती देणाºयांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.