शासकीय भूखंडातून अवैधपणे माती उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:31 AM2021-04-05T04:31:03+5:302021-04-05T04:31:03+5:30
चटोला येथील घटना लाखनीः तालुक्यातील चिचटोला येथे गैरकायदेशीरपणे व विनापरवानगीने माती उत्खनन करून विटा तयार करण्याचा व्यवसाय सुरू ...
चटोला येथील घटना
लाखनीः तालुक्यातील चिचटोला येथे गैरकायदेशीरपणे व विनापरवानगीने माती उत्खनन करून विटा तयार करण्याचा व्यवसाय सुरू असल्याने शासनाची दिशाभूल होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांच्याकडे केली आहे.
रेंगेपार (कोहळी) येथील देवीदास लांजेवार यांनी शासकीय गट क्र. ३३१ मधून गेल्या पाच वर्षापासून शासकीय खनिजाची चोरी करून विटा तयार करीत असून स्वतःचा लाभ करीत असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे. लांजेवार दरवर्षी १० लक्ष विटा तयार करत असतात. लांजेवार विटा तयार करण्याकरिता प्रेमदास चौधरी यांचे गट क्र.३३१ गटामध्ये असलेल्या अतिक्रमण जागेवर तयार केलेल्या विंधन विहिरीच्या पाण्याचा उपयोग करीत असतात. प्रेमदास चौधरी यांच्या नावाने विद्युत जोडणी घेतलेली आहे. शासकीय खनिजाची चोरी केल्यामुळे शासकीय जमिनीतून गैर कायदेशीरपणे विनापरवानगी उत्खनन केल्यामुळे त्यापासून विटा तयार केल्यामुळे कलम ४८ (७) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार व कलम ३७९ भा.दं.वि. नुसार कारवाई करण्याची मागणी चिचटोला व रेंगेपार (कोहळी) येथील ग्रामस्थांनी केली आहे.