ऊसापासून अवैध मद्यनिर्मिती
By admin | Published: January 23, 2017 12:23 AM2017-01-23T00:23:01+5:302017-01-23T00:23:01+5:30
तालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोहफुलापासून मद्यनिर्मिती केली जाते. आता दारू विक्रेत्यांनी नवीन दारूचा प्रकार शोधून काढला आहे.
तळीरामांच्या जीवाला धोका : तुमसर तालुक्यातील प्रकार, मध्यप्रदेशातील टोळी तालुक्यात दाखल
मोहन भोयर तुमसर
तालुक्यातील ग्रामीण परिसरातील मोहफुलापासून मद्यनिर्मिती केली जाते. आता दारू विक्रेत्यांनी नवीन दारूचा प्रकार शोधून काढला आहे. गुळापासून नियमबाह्यपणे मद्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात तालुक्यात सुरु आहे. मद्यनिर्मिती करताना रासायनिक पदार्थांचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे तळीरामांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून हा धक्कादायक प्रकार सर्रास सुरु आहे.
तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गावात गुळापासून मद्यनिर्मिती सर्रास सुरु आहे. नाकाडोंगरीपासून मध्यप्रदेशाच्या सीमा सुरु होते. मध्यप्रदेशात गुळापासून मद्यनिर्मिती केली जाते. मध्यप्रदेशातील मद्यनिर्मिती करणारे सध्या तुमसर तालुक्यात शिरकाव केला आहे. मोहफुलांचा तुटवडा आहे. सध्या उस पिकांची प्रचंड आवक वाढली आहे. कारखान्यात ऊस विक्री केल्यावर तात्काळ रक्कम मिळत नाही. तथा ये जा करण्यात मोठा वेळ लागतो. त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांकडून मद्यनिर्मिती करणारे नगदी ऊस पिक खरेदी करीत आहेत.
शेतकऱ्यांना ऊसाच्या नगदी मोबदला दिला जात असल्याने दलालामार्फत ऊस विक्री सुरु आहे. ऊसाच्या सडविण्यात येते. सडविण्याकरिता मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य व पदार्थांचा वापर केला जात आहे. प्रमाण नसल्याने दारु विषारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या दारुला भाव जास्त मिळतो. तळीरामांची ती पहिली पसंती ठरत आहे. लवकर व किंमत देणारी दारु म्हणून ती प्रसिद्ध पावत आहे. सध्या या दारुला मोठी मागणी असल्याची आहे. यापूर्वी नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पात्री, कवलेवाडासह परिसरात ऊसापासून मोठ्या प्रमाणात गुळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु होते. आता त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. गुऱ्हाळात गुळ तयार करायला मोठ्या अडचणी आहेत. बाजारात गुळाला भाव नाही. विक्रीकरिता परप्रांतात विक्री करावी लागते. त्यामुळे गुऱ्हाळ बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
दुसरीकडे मद्यनिर्मितीकरिता ऊसाचा वापर सुरु झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी नगदी ऊसाची विक्री येथे करीत आहे. ऊस कुठे जातो ते त्यांना माहिती नाही ही विशेष. पोलीस प्रशासन येथे मुग गिळून गप्प आहे. परिसरात मात्र दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. एकमात्र खरे ऊसाला येथे चांगला भाव मिळत आहे.