दोन ठिकाणच्या कारवाईत ३३०० रुपयांची अवैध देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:25+5:302021-08-21T04:40:25+5:30

या कारवाईनुसार विजय मेश्राम (३२) रा. डोकेसरांडी व विलास गुरनुले (४०) रा. किन्हाळा यांच्या विरोधात लाखांदूर पोलीसांत गुन्हा दाखल ...

Illegal liquor worth Rs 3,300 seized in two operations | दोन ठिकाणच्या कारवाईत ३३०० रुपयांची अवैध देशी दारू जप्त

दोन ठिकाणच्या कारवाईत ३३०० रुपयांची अवैध देशी दारू जप्त

Next

या कारवाईनुसार विजय मेश्राम (३२) रा. डोकेसरांडी व विलास गुरनुले (४०) रा. किन्हाळा यांच्या विरोधात लाखांदूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास तालुक्यातील डोकेसरांडी येथे विजय मेश्राम नामक इसमाच्या राहते घरी देशी दारुचा अवैध साठेबाजी केली असल्याची गोपनीय माहिती स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाला देण्यात आली. तर १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास किन्हाळा येथील विलास गुरनुले नामक ईसमाच्या राहते घरी अवैधरीत्या देशी दारुची साठेबाजी केली असल्याची गोपनीय माहिती लाखांदूर पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाद्वारा १८ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत १२०० रुपयाची देशी दारु जप्त करण्यात आली. १९ ऑगस्ट रोजी लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे व पोलीस अंमलदार अनिल साबळे यांच्याद्वारे किन्हाळा येथे केलेल्या कारवाईत २१०० रुपयाची देशी दारु जप्त करण्यात आली. दोन्ही घटनेची नोंद लाखांदूर पोलीसांनी घेतली असून अधिक तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Web Title: Illegal liquor worth Rs 3,300 seized in two operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.