गौण खनिजाचे अवैध उत्खनन वाढले

By admin | Published: December 30, 2014 11:28 PM2014-12-30T23:28:18+5:302014-12-30T23:28:18+5:30

तहसीलदार पवनी तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी दिवसरात्र अवैध मुरुम, रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करीत आहेत. तरी देखिल रात्री अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक

Illegal mining of minor minerals increased | गौण खनिजाचे अवैध उत्खनन वाढले

गौण खनिजाचे अवैध उत्खनन वाढले

Next

कोंढा कोसरा : तहसीलदार पवनी तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी दिवसरात्र अवैध मुरुम, रेती उत्खनन करणाऱ्यावर कारवाई करीत आहेत. तरी देखिल रात्री अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने अनेकांनी कोंढा परिसरात अवैध वाहतूक करणारे ट्रक्टर पाहिले, पण त्यांचा क्रमांक भितीमुळे सांगण्यास नकार दिला.
पवनी तालुक्यात अवैधपणे रेती तस्कर उत्खनन करून विकत आहेत. रेती उत्खनन करण्यासाठी जेसीबी मशिनचा वापर करीत असतात. रात्रभर नदीच्या घाटातील रेती उपसले जाते. त्यानंतर रात्रीला अवैध चोरटी रेतीची वाहतूक होत असते. महसूल विभागाने पुन्हा दक्ष राहून पोलीसाच्या सहकार्याने अवैध रेती उत्खनन थांबवून शासनाचे महसूल वाचविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
कोंढा परिसरात गौण खनिजामध्ये सर्वत्र मुरुम आढळते. त्याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोंढा गावाजवळील चुऱ्हाड नर्सरी आहे. नर्सरी लगत वनविभागाची खाली जागा आहे. तेथे रात्रीला जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन झाल्याचे अनेकांच्या निदर्शनात आले आहे. येथे रात्रीला हे उत्खनन होत असल्याने नागरिकांच्या लक्षात आले नाही. दि. २७ डिसेंबर २०१४ ला चुऱ्हाड नर्सरी येथील हनुमंताच्या मंदीरात महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्यासाठी अनेक गावचे आजूबाजूचे लोक महाप्रसादासाठी गेले तेव्हा मंदिराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सरकारी जागेत मोठमोठे खड्डे खोदले लोकांना दिसले. मुरुम अवैधपणे उत्खनन झाल्याचे लोकांनी सांगितले. १५ फुट खोल १० ते १५ हे.आर. जागेत अवैध उत्खनन केले आहे. यासाठी जेसीबी मशिनचा वापर केला असे लोकांनी सांगितले. महसूल विभागाकडून गौण खनिजाची परवाणगी सहजासहजी मिळत नाही. काही कंत्राटदार अवैधपणे कोणाला माहीती होऊ नये यासाठी रात्री जे.सी.बी. द्वारे मुरुमाचे उत्खनन करतात.
यासाठी ते महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरत असावे असे बोलले जात आहे. उत्खननामुळे सरकारी जागेत मोठमोठे बोळी, तलाव तयार झाले आहेत. अजून याकडे दुर्लक्ष झाल्यास शासनाच्या करोडो रुपयाचा महसूल बुधणार आहे. महसूल विभागाने दक्ष राहुन अवैध रेती, मुरुम उत्खनन बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Illegal mining of minor minerals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.