लाखांदूर तालुक्यात गौण खनिजांचे अवैध खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:13 AM2018-03-20T00:13:10+5:302018-03-20T00:13:10+5:30
तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.
आॅनलाईन लोकमत
लाखांदुर : तालुक्यात विकासाच्या नावावर गौण खनिज उत्खनन जोरात चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, लाखांदुर तालुक्यातील अनेक वाळूघाटाचे लिलाव न झाल्यानं वाळूचा उत्खनन आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत आल्याची चर्चा आहे.
विविध विकास कामे करण्यासाठी वाळू, गिट्टी, बोल्डर, आणि मुरुमचा अवैध उत्खनन करून वाहतुक ट्रॅक्टर, बैलगाडी द्वारे केल्या जात आहे. यावर संबंधित विभागाचा नियंत्रण नसल्याने गौण खनिज तस्करी करणाऱ्यांचे हौसले बुलंद होत आहेत. दरम्यान मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन व झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरण संतुलन बिघडत चालला आहे तसेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल डुबत आहे.
तालुक्यातील विविध ठिकाणी वीट भट्टी व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखांदूर तालुका जंगलव्यप्त असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करून खुलेआम विक्री होत आहे. सागवान व अन्य बहुउपयोगी झाडाची कत्तल करणारे ठेकेदार लुप्त आहेत.
झाडांची होणारी कत्तल पाहता येणाºया दिवसात जंगल फक्त कागदावरच दिसणार की काय..? असे प्रश्न निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या झाडाची कत्तली मुळे जंगलातील वनस्पती, औषधी आणि बहुउपयोगी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तरी देखील वनविभाग या घटनेला गंभीर घेत नाही आहे. लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली, गवराळा, मोहरना, इटान, नांदेड यासह अन्य गावात लावण्यात आलेली रोपवन नष्ट होत असून, रोपवणाच्या जागेवरच अतिक्रमण होत आहे मात्र संबंधित विभाग डोळे मिटून बसला आहे.
शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालयात, ग्रामपंचायत, नगरपंचायतला झाडे वितरित करून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केल्या गेले व या योजनेवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला मात्र यातून लावण्यात आलेले झाडांची स्थिती खूप बिकट आहे. या झाडांची देखभाल कोण करील मग या लागवडीचा फायदा काय..? असे सवाल नागरिक करीत आहेत.
विट व्यवसाय करण्यासाठी मातीचा उत्खनन, विकास कामासाठी वाळु, गिट्टी, मुरूम, बोल्डर उत्खनन, जंगलातील झाडांची कत्तल, होत असल्याने पर्यावरण खराब होत आहे आणि अनेक समस्या तालुक्यात उद्भवत आहेत. तापमान वाढत चालले आहे पाण्याची पातळी कमी झाली असल्याने लाखांदूर तालुका पूर्णत: नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर जात आहे. गौण खनिज उत्खनन वाहतूक, आणि झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्राकृतिक संतुलन बिघडत चालला आहे त्यामुळे या परिस्थितीला सुधारण्यासाठी योग्य नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.