निर्माणाधीन पुलाखाली अवैध पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:52+5:302021-05-31T04:25:52+5:30

लाखनी हे तालुक्याचे शहर आहे. त्यामुळे या शहराशी आजूबाजूच्या खेड्यांतील जनतेचे खास आकर्षण तसेच कामासाठी त्यांना लाखनीवर अवलंबून राहावे ...

Illegal parking under the bridge under construction | निर्माणाधीन पुलाखाली अवैध पार्किंग

निर्माणाधीन पुलाखाली अवैध पार्किंग

Next

लाखनी हे तालुक्याचे शहर आहे. त्यामुळे या शहराशी आजूबाजूच्या खेड्यांतील जनतेचे खास आकर्षण तसेच कामासाठी त्यांना लाखनीवर अवलंबून राहावे लागते. तहसील म्हणा की पोलीस ठाणे सर्व लाखनीत येत असतात. मात्र आणलेल्या गाड्यांची पार्किंग करायला लोक पुलाखालील जागा वापरतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. तसेच मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. पूल निर्माणाधीन असल्यामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नाही, याचा फायदा चोर प्रवृत्ती असणारे लोक घेतात. त्यामुळे गत काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल चोरीचे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. कोरोना काळात लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर निर्बंध आले, तर वरात नेण्याचा प्रकार फार कमी झाला. त्यामुळे मोठमोठ्या ट्रॅव्हल्सचे मालक उड्डाणपुलाखाली ट्रॅव्हल्स पार्किंग करतात. सामान्य जनतेला, एखाद्या अपंगाला रोड क्रॉस करताना फार त्रास होत असतो, त्याचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेदेखत होत आहेत. या सर्व प्रकारामुळे लाखनीची जनता फार त्रस्त झालेली आहे.

Web Title: Illegal parking under the bridge under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.