लाखनीत निर्माणाधीन पुलाखालीच अवैध पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:10+5:302021-05-31T04:26:10+5:30
लाखनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या शहरात आजूबाजूच्या खेड्यातील जनतेला विविध कामासाठी यावे लागते. तहसील, पोलीस ठाणे सर्व ...
लाखनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या शहरात आजूबाजूच्या खेड्यातील जनतेला विविध कामासाठी यावे लागते. तहसील, पोलीस ठाणे सर्व लाखनी शहरात येत असल्याने नागरिक पुलाखाली गाड्यांची पार्किंग करतात. यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते. पूल निर्माणाधीन असल्यामुळेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रकाशाची सोय नाही. याचा फायदा चोर प्रवृत्ती असणारे लोक घेतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल चोरीचे प्रकार या ठिकाणी झालेले आहेत. कोरोना काळात लग्न समारंभाच्या कार्यक्रमावर निर्बंध आल्याने मोठ्या ट्रॅव्हल्सचे मालकही उड्डाणपुलाखालीच ट्रॅव्हल्स पार्किंग करतात. सामान्य जनतेला एखाद्या अपंगाला रोड क्रॉस करताना फार त्रास होत आहे. येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व प्रकार पोलिसांच्या नजरेदेखत होत आहेत. या सर्व प्रकारामुळे लाखणीची जनता फार त्रस्त झाली आहे.