सिहोरा परिसरात अवैध मुरूम खोदकाम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:08+5:302021-07-26T04:32:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात खणन माफियाच्याकरवी शासकीय कामात अवैधरित्या खोदकाम करण्यात आलेला मुरूम उपयोगात आणला ...

Illegal pimple excavation continues in Sihora area | सिहोरा परिसरात अवैध मुरूम खोदकाम सुरूच

सिहोरा परिसरात अवैध मुरूम खोदकाम सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात खणन माफियाच्याकरवी शासकीय कामात अवैधरित्या खोदकाम करण्यात आलेला मुरूम उपयोगात आणला जात आहे. अवैध मुरूम खोदकामाची महसूल विभागाने चौकशी व कारवाई सुरू केली नसल्याने पुन्हा राजरोसपणे मुरुमाचे खोदकाम खणन माफियांनी सुरू केले आहे. धोरफोडीकरीता राखीव असणाऱ्या जागेला खणन माफियांनी टार्गेट केले आहे. याशिवाय जीवघेणे खड्डे तयार करण्यात आल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.

सिहोरा परिसरात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी मुरुमाची गरज असल्याने कंत्राटदार मुरुमाची शोधाशोध करीत आहेत. रॉयल्टीचा खर्च, वाहतुकीचा वाढता खर्च असल्याच्या कारणावरून एजन्सी धारक कंपन्यांनी लहान कंत्राटदारांना मुरुमाची कामे दिली आहेत. पेटी कंत्राटदारांनी पैशाची बचत करण्यासाठी गावांच्या शेजारी असणाऱ्या अनधिकृत खंदानमधून मुरुमाचे खोदकाम सुरू केले आहे. १ किलोमीटर अंतरच्या रस्त्याच्या कडेला मुरूम आवश्यक असल्याने एन. एन. पुगलिया यांनी मुरुमाचे कंत्राट गुप्ता नामक व्यक्तीला दिले आहे. कंत्राटदार गुप्ता यांनी गावातील जेसीबी मशीन धारकांला हाताशी धरून गावाच्या शेजारी असणाऱ्या खंदानमधून अनधिकृतरित्या मुरुमाचे खोदकाम केले आहे. शासकीय बांधकामात राजरोसपणे अवैधरित्या खोदकाम करण्यात आलेला मुरूम उपयोगात आणला आहे. रस्त्याच्या कडेला मुरूमाचे ढीग दिसत असताना महसूल विभागाने कारवाईकरीता पुढाकार घेतला नाही. मुरुमाचे पंचनामे करण्यात आले नाहीत. कंत्राटदाराच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली होती. परंतु नंतर चिरीमिरी घेऊन दडपण्यात आली असल्याची माहिती आहे. यामुळे गावात रोष आहे. महसूल विभागाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

धोरफोडीची जागा खणन माफियाच्या ताब्यात

धनेगाव, सोनेगाव गावांच्या शिवारात धोरफोडीकरीता जागा राखीव करण्यात आली आहे. तलाठी दस्तऐवजात तशी नोंद असली तरी प्रत्यक्षात राखीव जागा उपलब्ध नाहीत. धोरफोडीची कामे पडद्याआड गेल्याने खणन माफियाच्या नजरा या जागेकडे खिळल्या आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेच्या कंपन्यांना मुरुम विक्री करण्यासाठी अनधिकृत खोदकाम सुरू केले आहेत. रॉयल्टीचा भार बचत होत असल्याने कंत्राटदार या माफियाच्या संपर्कात येत आहेत. अनधिकृत मुरूम खोदकामाचा गोरखधंदा परिसरात राजरोसपणे सुरू करण्यात आलेला आहे. महसूल व वन विभागाची यंत्रणा सुस्त असल्याने मुरूम चोरीचे प्रकार बेधडक वाढले आहेत.

Web Title: Illegal pimple excavation continues in Sihora area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.