जवाहरनगर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:44 PM2017-11-17T23:44:38+5:302017-11-17T23:45:03+5:30

वनविभागाची परवानगी न घेता वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली.

Illegal slaughter of trees in Jawaharhanagar area | जवाहरनगर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल

जवाहरनगर परिसरात वृक्षांची अवैध कत्तल

Next
ठळक मुद्देदोन ट्रॅक्टर पकडले : भंडारा वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वनविभागाची परवानगी न घेता वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली. या वृक्षांची कटाई केल्यानंतर रात्रीला त्याची दोन ट्रॅक्टरमधून वाहतूक करण्यात येत होती. रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या जवाहरनगर पोलिसांनी पकडून भंडारा वनविभागाच्या सुपूर्द केले. या कारवाईने अवैध वृक्षतोड व त्याची वाहतूक करणाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहापूर येथील बाजारटोली परिसरातील नेहरु वॉर्ड निवासी कैलास मुरली सेलोकर यांच्या मालकीच्या दोन ट्रॅक्टरमधून ही वाहतूक करण्यात येत होती. साहुली परिसरातून वृक्षतोड केलेल्या लाकडांची वाहतूक करताना ही कारवाई करण्यात आली.
साहुली येथून वृक्षतोड केलेल्या लाकडांची वाहतूक सेलोकर हे त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमधून करीत होते. गुरुवारला रात्री ८ वाजताच्या सुमारास जवाहरनगरचे पोलीस उपनिरीक्षक ताराम हे आपल्या सहकाºयांसह रात्रगस्तीवर होते. साहूली ते जवाहरनगर दरम्यान ट्रॅक्टरमध्ये लादून आणित असलेल्या लाकडांबाबद ट्रॅक्टरचालकाला माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिले. त्यामुळे सदर लाकडांची अवैधरित्या वाहतूक करित असल्याचे लक्षात आल्याने पोलीस उपनिरीक्षक ताराम यांनी भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.
घटनेचे गांभीर्य ओळखून निलय भोगे हे वनरक्षक एस. एम. रामटेके वनमजुर रंजित हलदार, चालक अनिल शेळके यांच्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी ट्रॅक्टर चालकांना लाकडांची माहिती विचारल्यावर त्यांनी साहूली येथील एका खासगी गटातील वृक्षांची कटाई करुन सेलोकर यांच्या घरी नेत असल्याचे सांगितले.
मात्र वृक्ष कटाईची किंवा कटाई केलेल्या लाकडाची वाहतूक परवानगीबाबद विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.
घटनास्थळावर ट्रॅक्टर व त्यातील लाकडांचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त करुन आणण्यात आले. दरम्यान सेलोकर यांनी वनाधिकाºयांना या वृक्षतोडीचा परवाना असल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांना परवान्याची मागणी केली असता ते देण्यास असमर्थ ठरल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे.
बिना क्रमांकाची ट्रॅक्टर-ट्रॉली
लाकडांच्या वाहतूक प्रकरणी वनविभागाने जप्त केलेल्या ट्रॅक्टरपैकी एका ट्रॅक्टर व त्याच्या ट्रॉलीला नंबरच नाही तर दुसºया ट्रॅक्टरचा नंबर नसून केवळ ट्रॉलीचा (एमएच ३६ जी २५६२) नंबर असल्याचा गंभीर प्रकार या कारवाई दरम्यान उघडकीस आला आहे. यावरुन अवैधरित्या वाहतूकीचे काम करण्याकरिता ट्रॅक्टरमालकाकरिता अशाप्रकारचा ‘बिना नंबरचा फंडा’ वापरण्यात येत असल्याची चर्चा सुरु आहे.
ट्रॅक्टरला माल वाहतुकीची परवानगी?
उपप्रादेशिक परिवहन विभागातून वाहन चालविण्याची परवानगी व वाहनाला नंबर मिळाल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविता येते. कारवाईत पकडलेल्या ट्रॅक्टरला नंबर नसल्याने वाहतूकीचा परवाना मिळाला काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. दरम्यान दोन्ही ट्रॅक्टरला मालवाहतुकीचा परवाना आहे किंवा कृषी प्रयोजनाकरिता परवाना दिला याबाबत संदिग्ध भुमिका निर्माण झाली आहे.

दोन ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरुन नेत असल्याची माहिती प्राप्त झाली. घटनास्थळावर ट्रॅक्टर चालक व मालकाला वृक्षांच्या कटाई व वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांनी पंचनाम्यादरम्यान तो दाखविला नाही. या ट्रॅक्टरमुळे साडेसात बीट कटाई केलेले लाकडे आढळून आले. सध्या दोन्ही ट्रॅक्टर जप्त करुन वनविभागात जमा केले आहे.
- निलय भोगे
वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा

Web Title: Illegal slaughter of trees in Jawaharhanagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.