अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने माडगी येथे रेतीचा अवैध साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:20+5:302021-05-31T04:26:20+5:30

* * *माडगी शिवार बनला रेती तस्करीचा अड्डा, * * *रेती माफियांची नियोजित फिल्डिंग,शेतकरी त्रस्त * रेती चोरीमुळे करोडोचा ...

Illegal stockpiling of sand at Madgi with the blessings of the authorities | अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने माडगी येथे रेतीचा अवैध साठा

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने माडगी येथे रेतीचा अवैध साठा

Next

* * *माडगी शिवार बनला रेती तस्करीचा अड्डा,

* * *रेती माफियांची नियोजित फिल्डिंग,शेतकरी त्रस्त

* रेती चोरीमुळे करोडोचा महसूलला चुना

तुमसर : जिल्ह्यात सर्वात जास्त रेतीची तस्करी ही तुमसर तालुक्यातून होत आहे. सध्या रेती घाटाचा लिलाव झालेला नाही. तरीही वैनगंगा नदीच्या माडगी घाटातून रेतीचा बेसुमार उपसा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असून या घाटातून रेतीची सर्रास ओव्हरलोड तस्करी सुरू आहे. याकडे तहसीलदार सह पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असून ते बघ्याच्या भूमिकेत आहेत. रेती माफियांसोबत सेटिंग असल्यामुळे कुणीच अधिकारी कारवाई करीत नाही , रेती माफियाचे पोलिस व महसूल विभागासोबत मोठे आर्थिक व्यवहार होत असल्याणे येथे कुठलीही कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात आहे.

तालुक्यातील माडगी गावात रेती माफियाच्या टिप्पर वाहनांच्या वर्दळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर रेती, माती व धुळीचा थर बसत असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे. दररोज जवळपास ५० ट्रक ओव्हरलोड रेतीची तस्करी होत असल्याने शासनाचा कोट्यवधींचा महसुलला चुना लागत आहे. याबाबत तहसीलदारांना एक आठवडा पूर्वी माडगी घाटावर होत असलेल्या रेती उपसाबाबत व रेतीच्या अवैध साठा बाबत विडिओ क्लिप पाठवून माहिती देण्यात आली होती तेव्हा तहसीलदार तुमसर यांनी आता टीम पाठवतो असे सांगितले मात्र त्या दिवशी कोणतीच कारवाही झाली नसल्याने दुसऱ्या दिवशी परत त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठविण्यात आले त्यावेळी मी स्वतः तिथे जातो असे सांगून वेळ मारून नेली दरम्यान अवैध रेती घाटावर कोणतीही कारवाई न झाल्याने दररोज जवळपास ४० ते ५० ओव्हरलोड ट्रक रेती नागपूरला विकल्या जात आहे.यामुळे रोजचा शासनाचा जवळपास ८ लाखांचा महसूल लंपास होत आहे .मात्र यावर ठाणेदार व तहसीलदार काहीच करवाई करीत नाही .केली तरी महसूल विभागा एखादं ट्रॅक्टरवर थातूरमातूर कार्यवाही केली जाते. रेती माफियांशी साटेलोटे ठेवून अधिकारी मात्र मालामाल होत आहेत. रेती माफियांना प्रत्येक वाहनापोटीचा हप्ता ठरविला गेला आहे ट्रँक्टरकरिता ५ हजार तर ट्रकसाठी मनमानी हप्ता रेती माफिया देत असल्याची चर्चा आहे. यामुळे रेती माफियांना रान मोकळे आहे .

रेती माफियांना पोलिस व महसूल विभागाला हाताशी धरून दररोज लाखोंची उलाढाल करून शासनाच्या हातावर तुरी ठेवण्याचे काम करीत आहे. यात बीट जमादार , मंडळ अधिकारी व पटवारी हेही रेती तस्कराना मदत करतात . शिवाय यात पोलिस व महसूल विभागाचे लोकंही गुंतले आहे. परिणामी आज रक्षकच भक्षक बनले आहेत. अशी परिस्थिती दिसून येते त्यामुळे

परिसरातील नागरिक त्रस्त व घाबरलेले आहेत.यात शेतकऱ्यांची अवस्था सांगुच नका .आधीच पाण्यासाठी बेजार झालेला शेतकरी कुठून तरी पाणी आणून इंजिनद्वारे शेताला पाणी देत आहे.अख्खी रात्र नहरावर जागून काढत आहे.मात्र रेतीचा रात्रंदिवस उपसा करणाऱ्या वाहनामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला.कधी कुठले वाहन अंगावर येईल याचा बेत नाही.शिवाय सतत वाहनांच्या वर्दळीमुळे पिकांवर रेती, माती व धुळीचा थर बसलेला आहे .वाहनांनी धुरे तोडले आहे

Web Title: Illegal stockpiling of sand at Madgi with the blessings of the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.