रेतीची अवैध वाहतूक, दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 05:00 AM2022-03-11T05:00:00+5:302022-03-11T05:00:48+5:30
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी घटनास्थळी पोहोचून अरविंद मुंडे नामक व्यक्तीचे मैसी फर्ग्यूसन कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी २८७५ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जप्त केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : सकाळच्या सुमारास चुलबंद नदीतील दोन विविध घाटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली होती. त्यानुसार दोन विविध विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन भिन्न ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन रेतीने भरलेले ट्रॅक्टर जप्त केल्याची घटना घडली आहे. ही कारवाई ९ मार्च रोजी सकाळी ६ ते ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील सोनेगाव व दिघोरी मोठी येथे स्थानिक महसूल व दिघोरी मोठी पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी रेतीसह पकडलेल्या ट्रॅक्टरच्या कारवाईत ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजुरांविरुद्ध गुन्हा नोंद करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आला, तर स्थानिक महसूल प्रशासन अंतर्गत केलेल्या कारवाईत रेतीसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळच्या सुमारास तालुक्यातील तई येथील चुलबंद नदी घाटातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक नायब तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी घटनास्थळी पोहोचून अरविंद मुंडे नामक व्यक्तीचे मैसी फर्ग्यूसन कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ जी २८७५ रंगेहात पकडून रेतीने भरलेले ट्रॅक्टर लाखांदूर तहसील कार्यालयात जप्त केले आहे.
तर अन्य एका घटनेत स्थानिक दिघोरी मोठी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर केलेल्या कारवाईत सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३६ एजी ३००९ जप्त करून ट्रॅक्टर चालकासह ३ हमाल मजूरांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टर चालक सुभाष भिवा मेश्राम (४०) सह ईश्वर देविदार बानेवार (३२), गोपाल देविदास बानेवार (२८) व डेविड रमेश गोटेफोडे (२८) आदी हमाली करणाऱ्या मजुरांविरोधात गुन्हा नोंद करीत रेतीसह ट्रॅक्टर जप्त केला आहे. सदरची कारवाई दिघोरी/ मोठी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विनोद मैंद, घनश्याम वनवे, मानका शेंडे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
रात्रीच्या सुमारास होतेय तस्करी
- मागील काही दिवसांपासून तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी गटातून रात्रीच्या सुमारास रेती तस्करी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, स्थानिक महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे रेती चोरीप्रकरणी केलेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.