रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:07 AM2019-08-09T01:07:46+5:302019-08-09T01:08:19+5:30
जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली.
एक लांब पल्ल्याची ट्रक (एमएच ३६ आ ३७७५ अंदाजे १० ब्रास ) व दोन टिप्पर वाहन (एमएच ४० बीएल ५००१ अंदाजे ५ ब्रास व एमएच ४० बीएल ६००१ अंदाजे ५ ब्रास) विना परवाना अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आला. ट्रक जप्त करून पुढील कारवाईकरीता महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने जवाहरनगर पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आले.
सदर तिन्ही वाहनांवर जमीन महसूल संहिता अधिनियम १९६६ कलम ४८ (७) नुसार २० ब्रास रेतीवर रु दोन लक्ष ८ हजार व कलम ४८ (८) नुसार प्रति वाहन रु २ लक्ष प्रमाणे एकूण रु ६ लक्ष असे एकूण ८ लक्ष आठ हजार तसेच मोटार वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यातील रेती चोरीला आळा घालण्याचे निर्देश दिले असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात कारवाई सुरु आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून रेती चोरावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार यांना दिल्या आहेत. ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम व तहसीलदार अक्षय पोयाम यांचा देखरेखीत पार पडली.