रेतीची अवैध वाहतूक ; ट्रक-ट्रॅक्टर ताब्यात
By admin | Published: February 6, 2017 12:30 AM2017-02-06T00:30:40+5:302017-02-06T00:30:40+5:30
शहापूर परिसरात दिवसेंदिवस रेतीची गैरमार्गाने होताना शासनाच्या निदर्शनात माध्यमाद्वारे कळले असता महसूल विभागाने आपल्या विभागात मंडळ अधिकारी स्तरावर फिरते महसूल पथक स्थापन केले.
जवाहरनगर : शहापूर परिसरात दिवसेंदिवस रेतीची गैरमार्गाने होताना शासनाच्या निदर्शनात माध्यमाद्वारे कळले असता महसूल विभागाने आपल्या विभागात मंडळ अधिकारी स्तरावर फिरते महसूल पथक स्थापन केले.
आज रविवारला शहापूर - गोपीवाडा मार्गाने आपला मोर्चा वळविला. या मार्गाने रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रक कमांक एम.एच. ३६ - एफ १८४९ व एम.एच. ३६ एफ ३८४९ ला सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास मंडळ अधिकारी जयंत सोनवाने नेतृत्वात चमूने अडविले. तपासणी केली असता त्यांच्याकडे रेतीचा वाहतूक परवाना आढळून आलेला नाही. दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३६ एल ६९२६, एम.एच.एल. ५३५६ व एम.एच. ३६ एल एल ४३७४ ला ताब्यात घेतले. पुढील कारवाईकरिता जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. (वार्ताहर)