राष्ट्रीय महामार्ग रस्ता भरावात मुरूमाचा अवैधरीत्या वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:29 PM2019-01-07T21:29:51+5:302019-01-07T21:30:27+5:30

मोहाडी-तुमसर शिवारात राष्ट्रीय महामार्ग दुपदर्श रस्ता बांधकामात शेकडो ब्रास अवैध मुरूमाचा भराव करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. केवळ दीड हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. मुरूम उत्खनन स्थळी १२ ते १५ फुट खोल खड्डे पडले आहेत. खोल खड्यामुळे अदानी पॉवर कंपनीच्या टॉवर लाईनला येथे धोका निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा लाखोंचा महसूल येथे बुडाला आहे.

Illegal use of Murom in National Highway road filling | राष्ट्रीय महामार्ग रस्ता भरावात मुरूमाचा अवैधरीत्या वापर

राष्ट्रीय महामार्ग रस्ता भरावात मुरूमाचा अवैधरीत्या वापर

Next
ठळक मुद्देमोहाडी-तुमसर तालुका शिवारातील प्रकार : दीड हजार ब्रासची परवानगी, प्रत्यक्षात शेकडो ब्रासचे खनन

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मोहाडी-तुमसर शिवारात राष्ट्रीय महामार्ग दुपदर्श रस्ता बांधकामात शेकडो ब्रास अवैध मुरूमाचा भराव करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. केवळ दीड हजार ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी असताना त्यापेक्षा कितीतरी पट अधिक मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. मुरूम उत्खनन स्थळी १२ ते १५ फुट खोल खड्डे पडले आहेत. खोल खड्यामुळे अदानी पॉवर कंपनीच्या टॉवर लाईनला येथे धोका निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा लाखोंचा महसूल येथे बुडाला आहे.
मनसर-रामटेक-तुमसर-गोंदिया राज्यमार्गाला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा देण्यात आला. त्या अनुषंगाने रस्ता रूंदीकरणाची कामे सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खोदकाम करण्यात आले. खोदकाम केलेल्या जागेवर मुरूमाचा भराव करण्यात येत आहे. याकरिता मुरूमाची लीज काढण्यात आली. यात मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथे शासकीय नवीन गट क्रमांक ८१५/३ मध्ये प्रथम टप्यात ५०० ब्रास व दुसऱ्या टप्प्यात ५०० ब्रास मुरूम लीजला परवानगी देण्यात आली. नागठाणा शिवारात खाजगी जमीन गट क्रमांक ३१९/१,२,३ मध्ये ५०० ब्रास मुरूमाची लीजला परवानगी देण्यात आली. दोन्ही गट मिळून केवळ १५०० ब्रास मुरूमाची लीज येथे मिळाली आहे. प्रत्यक्षात दोन्ही गटातून शेकडो ब्रास मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे.
मुरूम उत्खनन स्थळी प्रचंड मोठे खोल खड्डे तयार झाले आहेत. संपूर्ण परिसर लहान तलावसदृश्य स्थिती आहे. नियमानुसार एक ते दीड मीटरपर्यंतच मुरूम उत्खनन करण्याची परवानगी शासनाकडून प्राप्त होते. येथे एका खाजगी जमिनीवरील मुरूम उत्खनाची परवानगी देण्यात आली. दोन्ही गटाशेजारीच अदानी पॉवरचे उच्च दाबाच्या वीज वाहिन्याचे प्रचंड मोठे खांब आहेत. गट क्रमांक ३१८ च्या शेजारी खांब क्रमांक १२९ तर गटक्रमांक ८१५ जवळ खांब क्रमांक १३१ आहे. दोन्ही खांबांना मुरूम उत्खनन केलेल्या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी वीज कंपनीने आंधळगाव पोलिसात तक्रार केली आहे, अशी माहिती आहे. ७ लक्ष ६५ व्हॅट व्होल्टची ही अतिशय उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. वीज खांबाचे अर्थिंग ग्राऊंडींगला निश्चितच धोका निर्माण झाला आहे.
याप्रकरणी महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. राष्ट्रीय महामार्गाची कामे दर्जात्मक, गुणात्मक व नियमानुसार केली जातात. हजारो ब्रास मुरूमाची सदर कामावर गरज आहे, परंतु केवळ कागदोपत्री दीड हजार मुरूमाची लीज घेऊन येथे रस्त्याचा भराव करण्यात येत आहे. साधी व सहज समजणारी ही प्रक्रिया आहे. दुर्लक्षाचे कारण काय, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. मुरूम उत्खनन करतानी नियमबाह्य उत्खनन केले आहे. याचा सबळ पुरावा मुरूम उत्खनन स्थळी दिसून येतो, तलाठी ते उपविभागीय अधिकाऱ्यापर्यंत अधिकाऱ्यांची फौज आहे, परंतु कारवाई व चौकशी करण्याचेच सांगण्यात येते. येथे नि:ष्पक्ष चौकशीची गरज आहे.

सालई बु. येथील मुरूम उत्खनन प्रकरणी संबंधित तलाठी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नियमबाह्य मुरूम उत्खनन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-स्मिता पाटील,
उपविभागीय अधिकारी, तुमसर.

Web Title: Illegal use of Murom in National Highway road filling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.