मग्रारोहयो योजनांची तत्काळ अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:26 AM2021-05-31T04:26:09+5:302021-05-31T04:26:09+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्षलागवड ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतांच्या बांधावर व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्णय होता. त्यातील अटीशर्तींमुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत होते. परिणामी शासनाच्या नियोजन विभागाने (रोहयो) ३० सप्टेंबर २०२०२ रोहयोअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी फळबाग व वृक्षलागवडीसाठी तांत्रिक प्रशासकीय मान्यतेचे अधिकाराचे नवीन परिपत्रक काढून सदरची कामे ग्रामपंचायतीकडून राबविण्याबाबत पंचायत समिती कृषी अधिकाऱ्याने तांत्रिक मान्यता देण्यास सांगितले आहे. मात्र यावर अजून अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी तत्काळ लाभार्थ्यांना लाभ द्यावे, अशी मागणी गट विकास अधिकारी धिरज पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली. यावेळी रायुकाँ तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, शुभम गभने, कार्तिक देशमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.