बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:49 AM2019-01-25T00:49:29+5:302019-01-25T00:50:13+5:30

बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Immediate remuneration for the Bavanthadi | बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला

बावनथडीग्रस्तांना तत्काळ मोबदला

Next
ठळक मुद्दे८५२ शेतकरी : तुमसर येथील आढावा बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बावनथडी प्रकल्पग्रस्त ८५२ शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेष मेळावे आयोजित करून मोबदला वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तुमसर येथे उपविभागीय आढावा बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी सुभाष चौधरी, तहसीलदार गजेंद्र बालपांडे उपस्थित होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची बावनथडी प्रकल्पात जमीन गेली आहे. मात्र अद्यापही अनेक शेतकºयांना मोबदला मिळाला नाही. ही बाब या बैठकीत आमदार चरण वाघमारे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी बावनथडी प्रकल्पातील ८५२ शेतकºयांना तात्काळ मोबदला वाटप करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांना दिले. यासाठी विशेष मेळावे आयोजित करण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बेटेकर बोथली प्रकल्पाच्या सांडव्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव शासनस्तरावरून तात्काळ मंजुरीप्राप्त होणार आहे. तसेच सोरणा प्रकल्प वनविभागाकडून जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी निधी सुपूर्त केला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. टंचाई व सिंचनाच्या कामात प्राधान्य देण्यात यावे असे सांगत पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सिंचन प्रकल्पातील कालव्यात साचलेला गाळ व कचरा प्राधान्याने काढण्यात यावा.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत खैरलांजी व पालोरा येथे आठ व दोन मेगावॅटचे उपकेंद्रासाठी जमीन प्राप्त झाली असून वीज निर्मिती झाल्यावर यावर तीन हजार सौर कृषीपंप कार्यान्वित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ठिकाणी वीज पोहचू शकत नाही तेथे सौर कृषीपंप देण्याची योजना असून त्यासाठी पाच व तीन एपीचा डिसी पंप देण्यात येतो. याची मुळ किंमत ३ लाख ८५ हजार व २ लाख ५५ हजार आहे. मात्र शासन सबसिडीवर हे पंप अनुक्रमे ३८ हजार ५०० व २५ हजार ५०० रुपयात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी तुमसर, मोहाडी तालुक्यातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. पाणीटंचाई, जलसंधारण व सिंचन, पांदन रस्ते योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते, सौर कृषीपंप, कर्जमाफी, पीक कर्ज वाटप, विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अन्न सुरक्षा योजना व ग्रामरक्षक दल आदींचा आढावा घेतला.
वर्ग एकचा ६९ हजार खातेदारांना फायदा
भोगवटादार वर्ग दोन मधून भोगवटादार वर्ग एक मध्ये समावेश करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ तुमसर व मोहाडी येथील ६९ हजार खातेदारांना मिळणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व सातबारा वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे.
सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत शहरीभागात राहणाºया नागरिकांजवळ तीन वर्षांची घरटॅक्स पावती असल्यास त्यांच्याकडून इतर पुरावे मागण्यात येऊ नये असे निर्देश त्यांनी दिले.

Web Title: Immediate remuneration for the Bavanthadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.