गणपतीचे विसर्जन कृत्रिम कुंडामध्ये करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:37 AM2021-09-11T04:37:03+5:302021-09-11T04:37:03+5:30
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे सार्वजनिक ...
जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे सार्वजनिक आणि घरगुती गणपतीची सजावट अगदी साधेपणाने करावी. गणपतीचे घरीच विसर्जन करावे, ते शक्य नसल्यास नगरपरिषदेमार्फत उभारलेल्या जवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात गणपतीचे विसर्जन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेश मंडळांनी आराेग्यविषयक व सामाजिक संदेश असलेले फलक दर्शनी भागात लावावे, भजन आरती व इतर कार्यक्रमांना गर्दी हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गणपती विसर्जनाच्या पारंपरिक पद्धती, विसर्जनस्थळी हाेणारी आरती घरीच करून केवळ कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करावे, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना काेराेना संसर्गामुळे विसर्जन स्थळी जाण्यास मनाई करावी.
काेराेनाचा संभाव्य धाेका लक्षात घेता गणेशाेत्सवासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीचे काटेकाेरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनाेद जाधव यांनी केले आहे.