मुरमाडी ग्रामपंचायतमध्ये लसीकरण केंद्र द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:37 AM2021-05-18T04:37:00+5:302021-05-18T04:37:00+5:30
मुरमाडी येथील जनतेला ग्रामीण रुग्णालय लाखनी आणि नगरपंचायत लाखनीच्या शिबिरात लसीकरणासाठी जावे लागते. वयोगट ४५ वरील लाभार्थ्यांचे लसीकरण ...
मुरमाडी येथील जनतेला ग्रामीण रुग्णालय लाखनी आणि नगरपंचायत लाखनीच्या शिबिरात लसीकरणासाठी जावे लागते. वयोगट ४५ वरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. मुरमाडी (सावरी)ची लोकसंख्या आठ हजारांच्या वर आहे. जनसंख्येचा विचार करता, मुरमाडीसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र ग्रामपंचायत मुरमाडी येथे सुरू करणे आवश्यक आहे. मुरमाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उपकेंद्र आहे.
मुरमाडीच्या प्रत्येक प्रभागाचे सॅनिटायझेशन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून स्वच्छतेचे पालन करून धूर फवारणी करण्याची मागणी नीलेश गाढवे यांनी केली आहे. ग्रामपंचायतचे पदाधिकारी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामपंचायतचे काही सदस्यांनी कोरोनामुळे ग्रामपंचायतमध्ये येणे बंद केले असल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाढवे यांनी स्पष्ट केले आहे.